आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • A Feast Of Poisonous Pastries To The Hungry Russian Army; Death Of Two, 28 Sick, Dissatisfaction In The Face Of Ukraine In Different Forms

रशिया-युक्रेन युद्ध:भुकेल्या रशियन सैन्याला विषारी पेस्ट्रीची मेजवानी; दोघांचा मृत्यू, 28 आजारी, युक्रेनच्या मनातील असंतोष वेगवेगळ्या रूपाने समोर

कीव्ह4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशियन सैन्याविषयी युक्रेनच्या मनातील असंतोष वेगवेगळ्या रूपाने समोर येत आहे. रशियन रणगाड्यांसमोर युक्रेनच्या शूरवीरांची छायाचित्रे जगाने पाहिली. पूर्व युक्रेनच्या इजियम शहरात उपासमारीने हैराण रशियन सैन्याला विषारी पेस्ट्री खाऊ घातल्याची घटना घडली. थर्ड मोटर रायफल डिव्हिजनच्या भुकेल्या सैनिकांनी स्थानिकांकडे भोजन मागितले. तेव्हा युक्रेनच्या नागरिकांनी अशा प्रकारे डाव खेळला. युक्रेनमध्ये पायरिजकी नावाची पेस्ट्री खूप लोकप्रिय आहे. रशियन सैनिकांना त्यांनी पायरिजकीच्या मेजवानीचे निमंत्रण दिले. युद्धकाळात रशियन सैन्याला योग्य प्रमाणात रसद मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच भुकेने व्याकूळ झालेल्या रशिय सैनिकांना मेजवानीचे हे निमंत्रण नाकारता आले नाही. मग ते सगळे सैनिक मेजवानीसाठी जमले. रशियन सैनिकांनी एकामागून एक अशा अनेक पेस्ट्री खाल्ल्या. काही वेळातच विषाक्त पेस्ट्रीने आपला परिणाम दाखवण्यास सुरुवात केली. त्यात दोन रशियन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर २८ सैनिकांवर उपचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी रशियन सैनिकांना विषारी दारूही पाजली होती. त्या घटनेत ५०० रशियन सैनिक आजारी पडले होते.

रशिया-युक्रेन युद्ध 39 वा दिवस
*रशिया नागरिकांची हत्या करतोय : युक्रेन
*बंदराचे शहर आेडेसामध्ये रशियन बाॅम्बहल्ले
*रशियावरील पाचवे निर्बंध आज जाहीर
*मायकोलेव शहरात दोन्ही बाजूने बाॅम्बहल्ले

बातम्या आणखी आहेत...