आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालोकांना जोडता येणारी अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे जीवनही सुखद होईल असा विचार २०२२ च्या सुरुवातीला समाजशास्त्रात संशोधन करणाऱ्या कोलंबस येथील जेसिका कॅलहॅन करीत होत्या. जेसिका यांनी पुस्तकांचे दुकान उघडण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मैत्रिणी ज्युली रॉस आणि ऑस्टिन कार्टर याही तोच विचार करीत होत्या.
जेसिका म्हणाल्या, आनंदी आयुष्यासाठी महत्त्वाचे काय आहे असा विचार लॉकडाऊनच्या काळात आमच्याप्रमाणेच अनेक जण करीत होते. त्या वेळी एकच उत्तर मिळाले ते म्हणजे बुक स्टोअर. आम्ही तिघींनी मिळून १ हजार चौरस फुटांच्या शोरूममध्ये पुस्तकांचे दुकान सुरू केले. केवळ हेच एक दुकान नव्हे, कोरोनानंतर अमेरिकन बुक सेलर्स संघटनेच्या (एबीए) सदस्य संख्येने २० वर्षांतील उच्चांक गाठला आहे. एबीएमध्ये गतवर्षी १७३ नव्या बुक स्टोअरची नोंदणी झाली आहे. यामुळे २५९९ ठिकाणांवर त्यांचे २१८५ स्टोअर झाले आहेत. महामारीमुळे मोठ्या प्रमाणात इतर दुकाने बंद झाली. अशा काळात एबीएच्या संख्येत ३०० सदस्यांची भर पडणे कौतुकास्पद आहे. संघटनेच्या मुख्याधिकारी अॅलिसन हिल म्हणाल्या, महामारीमुळे आमूलाग्र बदल झाला.लोक घरीच होते. त्यामुळे पुस्तकांची विक्री वाढण्यामागे ते प्रमुख कारण होते. फ्लोरिडासह अनेक ठिकाणी बुक स्टोअर असलेल्या मिशेन कपलान म्हणतात, गेल्या काही वर्षांपासून व्यवसाय खूपच वाढला आहे.
किशोरवयीन वाचक अधिक : विशेष म्हणजे २० अथवा त्यापेक्षा कमी वयाच्या अर्थात किशोरवयीन वाचकांची संख्या सर्वाधिक आहे. कॉलीन हुवर, अॅमिली हेन्री आणि टिकटॉकवरील अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींची पुस्तके त्यांना आवडतात. लेसिंगच्या पुस्तक विक्रेत्या निशेल लाॅरेन्स म्हणतात, स्थानिक दुकानांमध्ये वैविध्यपूर्ण पुस्तके नव्हती. आम्ही महिलांविषयक पुस्तकांवर लक्ष केंद्रित केले. त्याचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्याशिवाय २०२२च्या तुलनेत कादंबऱ्यांच्या मागणीत ८.५
टक्के वाढ झाली आहे. एनपीडी बुकस्कॅनच्या मते, २०२१ मध्ये अमेरिकेत प्रकाशकांनी ८४.३ कोटी पुस्तके विकली. २०२२ मध्ये ७८.८ कोटी पुस्तक विक्री झाल्याने हा कल कायम राहिला. याउलट सन २०१९ मध्ये तुलनेने कमी म्हणजे ७०.५ कोटी पुस्तकांची विक्री झाली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.