आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत गुजराती तरुणाची हत्या:​​​​​​​न्यूपोर्ट न्यूज शहरातील घटना, लूटमारीसाठी स्टोअरमध्ये शिरलेल्या 3 कृष्णवर्णीयांनी घातली गोळी

न्यूपोर्ट न्यूज17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेच्या न्यूपोर्ट न्यूज शहराच्या कन्व्हिनियंस स्टोअरमध्ये बुधवारी रात्री एका अमेरिकन तरुणासह गुजराती तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली. प्रेयस पटेल व एडवर्ड थॉमस अशी मृतांची नावे आहे. प्रेयस गुजरातच्या आणंद शहरातील होता. तो न्यूपोर्ट न्यूज शहरातील एका कन्व्हिनियंस स्टोअरमध्ये काम करत होता. या घटनेनंतर हल्लेखोर स्टोअरच्या कॅश बॉक्समधील काही रोकड व सामान घेऊन फरार झाले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली.

प्रेयस पटेल वर्षभरापासून स्टोअरमध्ये काम करत होते.
प्रेयस पटेल वर्षभरापासून स्टोअरमध्ये काम करत होते.

सहकाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नांत गेला बळी

हल्लेखोरांनी रोख रकमेसाठी प्रथम थॉमस यांना मारहाण सुरू केली. तेव्हा प्रेयस यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी दोघांनाही गोळ्या घातल्या. प्रेयस यांचे मोठे बंधू कुटुंबातील काही सदस्यांसह अमेरिकेला रवाना झालेत.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काही संशयीत कृष्णवर्णीयांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काही संशयीत कृष्णवर्णीयांना ताब्यात घेतले आहे.

वर्षभरापासून स्टोअरमध्ये करत होता नोकरी

प्रेयस पटेलच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेयस न्यूपोर्ट न्यूज सिटीतील क्लीन क्रीक पार्कवे येथील असलेल्या कन्व्हिनियन्स स्टोअरमध्ये वर्षभरापासून नोकरी करत होता. या स्टोअरमध्ये त्याच्यासोबत एडवर्ड थॉमस नावाचा आणखी एक कर्मचारी होता. या दोघांवर दुकानाची जबाबदारी होती. बुधवारी रात्री मुखवटा घातलेल्या तीन जणांनी दुकानात घुसून दोघांवर गोळीबार केला. त्यानंतर दरोडा टाकून ते पळून गेले.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू

गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. मात्र, मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे काही कृष्णवर्णीय संशयितांना ताब्यात घेतले आहे.

बातम्या आणखी आहेत...