आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्या:हाेळी साजरी केल्यामुळे पाकमध्ये हिंदू डाॅक्टरची गळा चिरून निर्घृण हत्या

हैदराबाद23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानातील हैदराबादमध्ये मंगळवारी रात्री एका हिंदू डाॅक्टरची निर्घृण हत्या करण्यात आली. डाॅक्टर धरमदेव राठी (६०) असे त्यांचे नाव असून ते त्वचाराेगतज्ज्ञ हाेते. त्यांच्या चालकानेच ही हत्या केली व ताे फरार झाला. हनीफ लेघारी असे फरार आराेपीचे नाव आहे.

राठी यांनी काही मित्रांसह हाेळी साजरी केली हाेती. त्याचा चालक लेघारीला राग हाेता. डाॅक्टर राठी रंगाेत्सवातून घरी परतल्यानंतर नाराज लेघारीने त्यांचा गळा चिरून हत्या केली. डाॅक्टर राठी हैदराबादच्या सिटिझन काॅलनीत राहत हाेते. हत्येच्या वेळी डाॅक्टरांचा कुक दिलीप ठाकूर स्वयंपाकघरात हाेता. त्याने पाेलिसांना हत्येची माहिती दिली.

बातम्या आणखी आहेत...