आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर 6 दिवस:विरोधकांना संपवण्यासाठी तालिबान्यांची ‘ब्लॅकलिस्ट’ घेऊन घरोघरी शोधमोहीम

काबूल2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानने ज्यांच्या हत्या करायच्या आहेत, त्यांची एक यादीच तयार केली आहे. या ब्लॅकलिस्टमध्ये सरकारी अधिकारी, पोलिस अधिकारी, सैनिक व पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचाही समावेश आहे. त्यांच्या हत्यांसाठी तालिबान ‘डोअर टू डोअर’ शोधमोहीम राबवत आहे. ४ दिवसांपूर्वी सर्वांना माफी दिल्याचा दावा करणाऱ्या तालिबान्यांना विरोधकांना जिवंतच ठेवायचे नाही. गुरुवारी एका पत्रकाराच्या नातेवाइकाची हत्या करण्यात आली.

४ लष्करी कमांडर्सचीही हत्या
तालिबानने पोलिस प्रमुख हाली मुल्ला यांना मारण्याच्या एका दिवसाआधीच चार लष्करी कमांडर्सचीही अशीच हत्या करण्यात आली. त्यांनीही आत्मसमर्पण केले होते. तालिबान्यांनी त्यांना कंदहारच्या स्टेडियममध्ये आणले. तेथे हातपाय बांधून जमावासमोर हत्या केल्या.

यादीतील लाेकांनी शरणागती पत्करूनही त्यांना ठार मारले जात आहे. गुरुवारी बदगिसचे पोलिस प्रमुख हाजी मुल्ला यांना भरचौकात ठार करण्यात आले. दहशत पसरवण्यासाठी या घटनेचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...