आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • A Large Section Is Rising Against 'feminism' In Korea; Men Are Calling It Mental Illness |Marathi News

सेऊल:द. कोरियात स्त्रीवाद विरोध बोकाळतोय, महिलांना महत्त्व दिले जात असल्याने पुरुष वर्गात असंतोष

सेऊल / जो सांग-हुनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कार्यालयीन वेळेत पुरुषांचा एक गट काळे कपडे परिधान करून काही निषेधाच्या घोषणा देत आहे. महिलांच्या समर्थनार्थ रॅली काढणाऱ्यांचा निषेध नोंदवला जात आहे. ‘पुरुषांचा द्वेष करणाऱ्यांनो स्त्रीवाद हा एक मानसिक आजार आहे..’ अशा घोषणा स्वत:ला स्त्री हक्कवादी म्हणवून घेणाऱ्या पुरुषांना उद्देशून दिल्या जात होत्या. सेऊलमधील रस्त्यावर विरोध करणाऱ्या या छोट्या गटाला भलेही नाकारता येऊ शकेल. परंतु दक्षिण कोरियात ऑनलाइन वाढत असलेल्या स्त्रीहक्कविरोधी भावनांकडे दुर्लक्ष करता येऊ शकत नाही, असे विश्लेषकांना वाटते. या मुद्द्याचे समर्थन करणारा एक विशाल वर्ग निर्माण होऊ पाहत आहे. वर्ग समाज तसेच राजकारणावर देखील हा मुद्दा थोपवण्याचे वेगाने प्रयत्न करत आहे. स्त्री हक्कवादाचा संबंध येत असलेल्या प्रत्येक गोष्टीला लक्ष्य करण्याचा धडाकाच या पुरुष कार्यकर्त्यांनी लावला आहे.

देशातील एका प्रतिष्ठित विद्यापीठात दुराचारासारख्या विषयावर चिंतन मांडू पाहणाऱ्या महिला वक्त्याला रोखण्यात आले. हे त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या एन सॅन यांच्यावर केस कापल्यामुळे टीकेची झोड उठवण्यात आली. देशातील व्यापार-उद्योगाला धमकी देणे हे पुरुषवादी कार्यकर्त्यांचे पुढचे पाऊल मानले जाते. स्त्रीवादी अजेंड्यासाठी सरकारवरही टीका केली जात आहे. त्याही पुढे जाऊन राष्ट्रपती पदाच्या शर्यतीमधील उमेदवारांकडून देशाच्या लिंग समानता व कुटुंब कल्याण विभागात सुधारणा करण्याचे आश्वासन देखील पुरुषवादी कार्यकर्त्यांनी घेऊन ठेवले आहे.

लिंगभेदभावामुळे नुकसान, ७९ टक्के पुरुषांचे मत
अशाच एका गटाचे प्रमुख बे इन-क्यू म्हणाले, आम्ही महिलांचा द्वेष करत नाहीत. परंतु स्त्रीवाद ही सामाजिक कुप्रथा आहे. यूट्युबवर या गटाचे ४.५ लाखांवर फॉलोअर्स आहेत. देशातील पुरुषांना असुरक्षित वाटते, असा दावा हा गट करतो. काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका पाहणीत विशीतील ७० टक्के पुरुषांनी लिंग भेदभावामुळे नुकसान झाल्याचा दावा केला.

बातम्या आणखी आहेत...