आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खटला सुरू:जिनपिंग यांचा राजीनामा मागणाऱ्या वकिलावर गुपचूप खटला सुरू

बीजिंग2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या तिसऱ्या कार्यकाळाबद्दल असंतोष शांत करण्यासाठी एका मानवी हक्क चळवळीच्या वकिलांवर गुप्तपणे खटला चालवला जात आहे. जू जियाेंग यांनी जिनपिंग यांच्याविरोधात वक्तव्ये केली होती. जिनपिंग पूर्वीसारखे स्मार्ट राहिलेले नाहीत. त्यामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. या प्रकरणात शेडाँग प्रांतातील लिंशू कौंटीच्या एका न्यायालयात गुप्त सुनावणी झाली. त्यात तूर्त शिक्षा ठोठावण्यात आलेली नाही. सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीत जिनपिंग यांच्याविरोधात असंतोष पूर्वीपासून दुपटीवर गेला आहे. जिनपिंग तिसऱ्या कार्यकाळात आपली पकड मजबूत करतील, असे बोलले जाते.

बातम्या आणखी आहेत...