आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रेंड:बालपणीच्या आठवणीच बनल्या आैषधी, संतुलित जीवन जगण्यासाठी लोकांना हे आवश्यक वाटते

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बालपणीच्या कामांचे व्हिडिआे सोशल मीडियावर अपलोड करण्याची क्रेझ वाढतेय

लहानपणी तुम्ही खूप व्यथित झाले असाल अशा काही घटना घडल्या असतील. इनर चाईल्ड वर्क ही एक विशिष्ट प्रक्रिया आहे. यात लहानपणीच्या आठवणींशी संंबंधित काही घटनांशी स्वत: बद्दलचे पुनर्मुल्यांकन केले जाते. ही पद्धती तुम्हाला स्वत:चा स्वभाव व विचार करण्याची पद्धत याबद्दल जाणून घेण्यास खूप मदत करते. म्हणूनच सोशल मीडियावर इनर चाइल्ड वर्क हा ट्रेंड वेगाने वाढत आहे. विशेष म्हणजे लोक बालपणीच्या आठवणींना उजाळा देऊन स्वत:ला हील करू लागले आहेत. एवढेच नव्हे तर ही गोष्ट संतुलित जीवन जगण्यासाठी गरजेची असल्याचा दावाही करत आहेत. त्याचे व्हिडिआे बनवून इतर लाेकांना जागरूक करत आहेत. उपायांबद्दलही सांगत आहेत. येथे टिकटॉकसारख्या प्लॅटफॉर्मवर हॅशटॅग इनर चाइल्ड हिलिंग, इनर चाइल्डलव्ह सारखे टॅगसह ते अनेकवेळा दृष्टीस पडू लागले आहेत. अशा प्रकारच्या व्हिडिआेंना अब्जावशी लाइक व कमेंट मिळत आहेत. इनर चाइल्ड वर्कमुळे तुम्ही आपल्या बालपणीच्या आठवणींसह संपूर्ण नवीन चित्र साकारू शकता. यातून तुम्ही बदललेली विचारसरणी, वर्तनाला जाणून घेऊ शकता. कारण त्याचा जीवनाच्या इतर पैलूंवर परिणाम होत असतो. जीवनातील अस्थैर्याला देखील आेळखता येते. मानसिक आरोग्यासाठी इनर चाइल्ड वर्क एक महत्त्वाचे तंत्र मानले जात आहे.