आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गूढ आजार:टांझानियात पसरला गूढ आजार, रक्ताच्या उलट्या झाल्याने 15 जणांचा मृत्यू

दार ए सलाम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले

टांझानियात एक गूढ आजाराचा फैलाव झाला आहे. या आजारात पीडितांना रक्ताच्या उलट्या होतात. या आजारामुळे आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाला असून ५० जण बाधित आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, टांझानिया सरकारने या आजाराचा खुलासा करणाऱ्या चुन्या जिल्ह्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी फेलिस्ता किसांदू यांना निलंबित केले आहे. किसांदू यांनी म्हटले होते की, संसर्गाच्या तपासणीसाठी रुग्णांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. मात्र, उद्रेकाचे संकेत नसल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. भीती निर्माण केल्याने किसांदू यांना निलंबित केल्याचेही सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...