आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन औषध:स्टॅटिनच्या दुष्परिणामांमुळे त्रासलेल्या रुग्णांसाठी कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणारे नवीन औषध

वाॅशिंग्टन14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ५०% पर्यंत कमी करून हृदयविकाराच्या प्रतिबंधासाठी स्टॅटिन्स प्रभावी आहेत. परंतु ७ ते २९% लोक स्नायू कमकुवत होणे आणि वेदना यांसारख्या दुष्परिणामांमुळे ते कायम चालू ठेवू शकत नाहीत. आता स्टॅटिन्सचा एक पर्याय आहे ज्याचे कमी दुष्परिणाम आहेत. दरवर्षी ४४ लाख किंवा ७.८% मृत्यू हे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असल्यामुळे हाेतात.

न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित संशाेधनात असे दिसून आले आहे की नवीन औषध बेम्पेडोइक ऍसिड कोलेस्ट्रॉल व हृदयविकाराचा धोका कमी करते. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने त्याला मान्यता दिली. फार्मा कंपनी अॅस्पेरियन थेरेपिटिक्सने तयार केलेले हे औषध नेक्सलेटल या नावाने विकले जात आहे. या औषधाचा तीन वर्षांच्या चाचणीमध्ये उच्च कोलेस्टेरॉल असलेल्या आणि हृदयविकाराचा धोका असलेल्या १४ हजार लोकांचा समावेश होता. क्लीव्हलँड क्लिनिकचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. स्टीव्हन निसेन म्हणतात की बेंपेडोइक ऍसिड घेतल्याने नियमित गोळ्यांच्या तुलनेत एलडीएल २१% कमी होते. त्यांच्यामध्ये हृदयविकाराचा धोका किंवा त्यामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १३ टक्क्यांनी कमी झाले आहे. एकंदरीत, जे लोक स्टॅटिनचे तोटे सहन करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी हा एक प्रभावी पर्याय आहे. संशोधक म्हणतात ज्यांना स्टॅटिनचा सल्ला देण्यात आला होता त्यापैकी २०% रुग्णांनी दोन दशकांत ते घेणे बंद केले.

नवीन औषधामुळे स्टॅटिनप्रमाणे स्नायू कमकुवत होत नाहीत बेम्पेडोइक अॅसिडमुळे स्नायू कमकुवत होण्याच्या समस्या स्टॅटिनप्रमाणे उद्भवत नाहीत. यामुळे रक्तातील युरिक ऍसिड, क्रिएटिनिनची पातळी वाढते. संधिवात असलेल्या लोकांसाठी ते हानीकारक आहे.

बातम्या आणखी आहेत...