आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपास:ट्रम्प यांच्यावर खटला चालवण्याचा मसुदा तयार करतेय संसदीय समिती

पीटर बेकर, केटी बेनेर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल बदलण्याचा कट रचल्याचा निष्कर्ष अमेरिकन संसद-काँग्रेसच्या समितीने काढला आहे. मात्र, अॅटर्नी जनरल अद्याप या निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत. ६ जानेवारी २०२१ ला पार्लमेंट हाऊसवर झालेल्या हल्ल्यातील पहिली सुनावणी ट्रम्प यांच्यावर मतदारांच्या इच्छेचा भंग केल्याबद्दल व सत्तेत राहण्याचा प्रयत्न केल्याबद्दल फौजदारी खटला चालवायचा का, या प्रश्नाभोवती फिरली.

गुरुवारी रात्री प्राइम-टाइम टीव्हीवर प्रसारित झालेल्या दोन तासांच्या सुनावणीत संसदीय समितीने सत्तेचे हस्तांतरण थांबवण्यासाठी ट्रम्प यांच्या सात-सूत्री योजनेला बेकायदेशीर आणि असंवैधानिक म्हटले. काही हल्लेखोरांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा नोंदवताना समितीने न्याय विभागाचा हवाला दिला. अनेक माजी प्राॅसिक्युटर आणि वरिष्ठ वकिलांनी नंतर सांगितले की, सुनावणीत काँग्रेसच्या कामात अडथळा आणण्यासाठी गुन्हेगारी खटला तयार केल्याचे पुरावे सादर करण्यात आले.

समितीच्या उपप्रमुख रिपब्लिकन खासदार लिझ चेनी म्हणाल्या की, ट्रम्प यांना त्यांच्या सल्लागारांनी वारंवार सांगितले होते की, ते निवडणूक हरले आहेत. तरीही निवडणुकीत हेराफेरी झाल्याचे ते देशासमोर खोटे बोलत राहिले. महत्त्वाच्या राज्यांची मतमोजणी मान्य करू नये यासाठी त्यांनी आपले उपाध्यक्ष आणि राज्य, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणला होता.

बातम्या आणखी आहेत...