आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालहानपणापासून वृद्धत्वापर्यंत आपली भोजनाची थाळी सारखी राहत नाही. अन्नाची उपलब्धता, हवामान, कामाचे स्वरूप यावर तिचे स्वरूप आणि प्रमाण ठरते. एका अंदाजानुसार माणूस जीवनभरात सुमारे ३५ टन म्हणजे सुमारे साडेतीन ट्रक भोजन करतो. डाएटिशियन प्रिया तियू म्हणाल्या, भोजनात प्रथिने, कडधान्ये, फळ आणि भाज्यांसह, फॅट आणि डेअरी उत्पादनांची गरज असते. डॉक्टर कॅरी रक्सटन म्हणाल्या वयानुसार डाएट ठेवावे.
डाएटिशियन डॉक्टर कॅरी रक्सटन जीवनाला वयानुसार ७ भागांत विभागतात. त्यात वयानुसार गरज स्पष्ट केलीय
व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियमची गरज सर्वाधिक असते. हिरव्या भाज्या, डेअरी उत्पादने, काजू खावेत. त्यामुळे आॅस्टिओपोरोसिससारखे हाडांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
0-6 वर्षे : या वयात व्हिटॅमिन ए, सी व ओमेगा-३ ची जास्त गरज असते. ए गाजर, हिरव्या भाज्यांत मिळते. सी ब्रोकली, मिरची व सर्व आंबट पदार्थांतून मिळते. व्हिटॅमिन डी उन्हाव्यतिरिक्त अंडी, माशांतून मिळते.
7-11 वर्षे : व्हिटॅमिन ए,डी, झिंक व ओमेगा-३ ची गरज असते. सी-फूड व मांसात झिंक जास्त असते. झिंकसाठी अंडी, बदाम, कडधान्ये खावीत. सीफूड, मासे असावे. गोड, मेदयुक्त पदार्थाबाबत सावध असले पाहिजे.
20-29 वर्षे : व्हिटॅमिन डी, कॅल्शियम, मॅग्नेशियमची गरज सर्वाधिक असते. हिरव्या भाज्या, डेअरी उत्पादने, काजू खावेत. त्यामुळे आॅस्टिओपोरोसिससारखे हाडांचे आजार होण्याची शक्यता कमी होते.
30 ते 39 वर्षे : या वयात पोटॅशियम, ओमेगा-३, व्हिटॅमिन बी-५ ची गरज असते. हिरव्या भाज्या, कडधान्य, सलॅड मोठ्या प्रमाणात खावे. थाळीच्या तिसऱ्या भागात कडधान्य असावे.
12-19 वर्षे : हे शारीरिक विकासाचे वय असते. या वयात व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, आयर्नची जास्त गरज असते. मुलांच्या हाडांच्या विकासासाठी कॅल्शियम व पाळीच्या दृष्टीने मुलींना आयर्नची जास्त गरज.
40 ते 59 वर्षे : मेटाबॉलिझम कमी होते. वजन वाढते. कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन डी, बीची गरज भासते. गहू, ज्वारी, बाजरीचा आहारात समावेश असावा. भाजी, चणे, चिकन खावे.
60 हून जास्त : ओमेगा-३, व्हिटॅमिन डी, ए व सीची सर्वाधिक गरज असते. सलॅड जरूर असले पाहिजे. सीफूडसोबतच हिरव्या पालेभाज्या, विविध धान्यांचा वापर, फर्मेंटेड सोया, काही प्रमाणात डेअरी उत्पादने खावी. या वयाच्या थाळीत सर्व पोषक तत्त्वे असली पाहिजेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.