आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी तरुणाचा होणार शिरच्छेद:खून खटल्यात सौदीत आहे जेरबंद; वाचण्याचे केवळ 2 मार्ग - धर्मांतर किंवा 2 कोटी

चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
​​​​​​​चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते रुपींदर मनावा व बलविंदर यांचे बंधू. - Divya Marathi
​​​​​​​चंदीगडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सामाजिक कार्यकर्ते रुपींदर मनावा व बलविंदर यांचे बंधू.

पंजाबच्या मुक्तसर जिल्ह्यातील मल्लन गावचा बलविंदर नामक तरुण सौदी अरेबियाच्या तुरुंगात बंदिस्त आहे. त्याच्यावर खूनाचा आरोप आहे. त्याच्यापुढे जगण्याचे केवळ 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक -ब्लड मनी म्हणून 2 कोटी भारतीय रुपये जमा करणे. दोन- इस्लाम धर्म स्विकारणे. बलविंदरने या दोन्हीपैकी काहीच केले नाही तर 4 दिवसांनंतर त्याचा शिरच्छेद केला जाईल. त्याला वाचवण्यासाठी त्याचे नातेवाईक शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी आतापर्यंत जवळपास सव्वा कोटीची रक्कम गोळा झाल्याचे स्पष्ट केले आहे.

बलविंदरचा भाऊ जोगिंदर व सामाजिक कार्यकर्ते रुपिंदर मनावा यांच्या माहितीनुसार, बलविंदर 2008 मध्ये सौदीला गेला होता. तो तिथे एका कंपनीत नोकरी करत होता. त्याने कंपनी मालकाचा विश्वास संपादन केला. तो त्यांची कार चालवू लागला. त्याला कोणते व्यसनही नव्हते.

मद्यपी कर्मचाऱ्याचे डोके आदळल्याने झाला मृत्यू

पण, 2013 मध्ये कंपनीत एका कर्मचाऱ्याने अचानक गोंधळ घातला. तेव्हा बलविंदरला सुपरवायझर म्हणून काम करत होता. त्यामुळे मालकाने त्याला तत्काळ कंपनीत जाण्याची सूचना केली. त्यानुसार, त्याने कंपनीत जाऊन सदर कर्मचाऱ्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो चाकू घेऊन बलविंदरच्या मागे लागला. त्याने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण, या झटापटीत त्याचे डोके जमिनीवर आदळले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

कंपनीने केली नाही मदत

त्यानंतर सौदी पोलिसांनी बलविंदरला अटक केली. बलविंदरने त्यांना या प्रकरणी आपली कोणतीही चूक नसल्याचे खूप समजावून सांगितले. पण, त्याला अपयश आले. अखेर त्याला 7 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. पण, आतापर्यंत त्याने 9 वर्षांची शिक्षा भोगली आहे. या काळात कंपनीने त्याची कोणतीही मदत केली नाही. त्याच्या नातेवाईकांनी या प्रकरणी दुबईचे हॉटेल व्यावसायिक एस.पी.एस.ओबेरॉय यांच्याशी संपर्क साधला. पण, त्यांनीही हात वर केले. अखेर ते आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे आपली व्यथा मांडणार आहेत.

बलविंदर धर्मांतरास तयार नाही

रुपिंदर यांनी सांगितले की, त्यांनी या प्रकरणी सौदीच्या काही संघटनांशी संपर्क साधला. त्यांनी बलविंदरने इस्लाम धर्म स्विकारला तर दुसऱ्याच दिवशी ब्लड मनी जमा करण्याची तयारी दर्शवली. पण, बलविंदने धर्मांतर करण्यास साफ नकार दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...