आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:9 वर्षांनी मिळाले पिकासोचे दुर्मिळ चित्र, पाहुण्यांनी बघावे व आपली प्रतिष्ठा वाढावी म्हणून बांधकाम मजूर घेऊन गेला

अथेन्सएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नॅशनल गॅलरीतून 2012 मध्ये गायब झालेली 3 चित्रे, एकाची किंमत 372 कोटींपर्यंत

प्रसिद्ध चित्रकार पिकासो, इटालियन कलाकार गुग्लिल्माे कॅसिया यांचे ‘हेड ऑफ अ वुमन’ हे चित्र २०१२ मध्ये अॅथेन्सच्या नॅशनल गॅलरीतून गायब झाले हाेते. हे चित्र गायब कसे झाले हे अातापर्यंत एक रहस्यच बनून राहिले हाेते. जवळपास एक दशक त्याचा शाेध घेतल्यावर अाता ते चित्र ९ वर्षांनी मिळाले अाहे. अाश्चर्याची गाेष्ट म्हणजे अॅथेन्सजवळच्या पाेर्टाे राफ्टी नजाकच्या एका जंगलात खड्ड्यात हे चित्र मिळाले हाेते. त्यानंतर ते नॅशनल गॅलरीत ठेवण्यात अाले. यामधील पिकासाेच्या चित्राची किंमत अंदाजे ३७२ काेटी रुपये अाहे.

पाेलिसांच्या मते हाॅलिवूड चित्रपटाच्या स्टाइलमध्ये म्युझियममधून चित्रे गायब करणारी ही टाेळी नव्हती तर ते चाेरणारा एक ४९ वर्षांचा बांधकाम मजूर हाेता पण त्याचे नाव जाहीर करण्यात अाले नाही. पण साेशल मीडियावर त्याचे नाव अार्टफ्रीक अाहे. त्याला अटक करण्यात अाली अाहे. अापल्याला कला अाणि कलाकृतीमध्ये खूप स्वारस्य हाेते असे अाराेपीने सांगितले. त्याची कसून चाैकशी केल्यानंतर चाेरी कबूल केली अाणि स्वत:च हे चित्र दिले.

२०१२ मध्ये मी एकदा नॅशनल गॅलरीत गेलाे हाेताे त्यावेळी मला तिन चित्रे मिळाली. मी ती उचलली. घरी येणारे पाहुणे ते बघून खुश व्हायचे. मी त्यांना या चित्रांबद्दल सांगायचाे त्यावेळी नातेवाइकांमध्ये माझी प्रतिष्ठा वाढायची. इतकी वर्षे मी ती सांभाळून ठेवली. पण गेल्या वर्षी मेमध्ये पाेलिसांनी चित्रांचा शाेध वाढवला तेव्हा ती मी अन्यत्र घेऊन जाण्याचा विचार केला. त्यानंतर माझी झाेप उडाली. मला माझ्या कृत्याचा पश्चात्ताप हाेत अाहे, असे अाराेपीने न्यायालयात सांगितले. अाराेपीने काेर्टात जे सांगितले ते ग्रीक माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले अाहे. अाराेपीचे वकील सकीस केहागिअाेग्लू यांनी यास दुजाेरा दिला.

१९३९ मध्ये रेखाटले हाेते ‘हेड ऑफ अ वुमन’
पिकासाेने १९३९ मध्ये हेड अाॅफ अ वुमन चित्र रेखाटले हाेते नंतर त्यांनी ते नाझींच्या विराेधासाठी ग्रीक लोकांना समर्पित केले. डच चित्रकार मोंड्रियन यांनी रेखाटलेले ‘स्टॅमर विंडमिल’ चित्र १९०५ मधील अाहे. तिसरे चित्र १६ व्या शतकातील असून ते इटलीतील चित्रकार गुग्लिल्माे कॅसिया यांनी काढले हाेते. चाेरीनंतर कॅसियाच्या चित्राचे नुकसान झाले असून बाकीची चांगल्या स्थितीत अाहेत.

बातम्या आणखी आहेत...