आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संपूर्ण जग काेराेनाशी लढा देत आहे, परंतु या संकटाच्या काळातही मास्क बनवणारेदेखील खूप कल्पक झाले आहेत. जपानमध्ये हायपर रिअॅलिस्टिक मास्कची विक्री सुरू झाली आहे. एखाद्या अनाेळख्या व्यक्तीच्या चेहऱ्यासारखा अगदी हुबेहूब असा हा असेल. एखाद्या व्यक्तीसमाेर तुम्हाला अनाेळखी बनवण्याची ताकद या मास्कमध्ये आहे. ग्राहक आपल्या पसंतीच्या चेहऱ्याचा मास्कही बनवून घेऊ शकतात. हा मास्क लावल्यावर खराखुरा चेहरा असल्याचाच भास हाेताे. परंतु हा मास्क काेराेनापासून मात्र रक्षण करू शकणार नाही. पण बघणाऱ्यांना आश्चर्यचकित करण्यासाठी पुरेसा आहे.
बा थ्रीडी मास्क बनवणारे शुहेई आेकावारा म्हणाले, हा मास्क खास करून सार्वजनिक ठिकाणी आपली खरी आेळख लपवण्याची इच्छा असलेल्या जपानमधील वयस्कर व्यक्तींसाठी आहे. एखादी पार्टी किंवा कार्यक्रमात हा मास्क लावून जाणे त्यांना आवडेल. आेकावारा म्हणाले की, मी हा प्रकल्प आॅक्टाेबरमध्ये सुरू केला. काेराेनामुळे हा मास्क लाेकांच्या पसंतीस पडेल याची मला खात्री हाेती. त्यानंतर मी काही तरुणांकडून त्यांना जसे दिसण्याची इच्छा आहे त्या प्रकारचे फाेटाे मागवले. लाेकांची परवानगी घेऊनच त्यांच्या चेहऱ्याचा उपयाेग केला जात असून त्याबद्दल त्यांना रक्कमही देण्यात येत आहे.
मास्कची मागणी आणखी वाढेल असे आेकावारा यांना वाटते. ते म्हणतात, सध्या लाेक माझ्या ‘कमेन्या आेमाेटे’ दुकानात येतात, मास्क खरेदी करत नसले तरी त्यांना ही कल्पना खूप आवडली आहे. कलात्मक वस्तू म्हणून मास्कचे काैतुक करत आहेत. आेकावारा दुसऱ्या देशातील लाेकांच्या चेहऱ्याचे मास्क बनवण्याच्या तयारीत आहे.
जगासाठी अनाेळखी ठरवणाऱ्या मास्कची किंमत ७० हजार
शुहेई आेकावारा (छायाचित्रात) म्हणाले, आता ज्या माॅडेलचा चेहरा मास्कसाठी निवडताे त्या माॅडेलला ४० हजार येन म्हणजे अंदाजे २८ हजार रुपये देताे. आतापर्यंत १०० जणांनी मागणी केली आहे. त्यांना नवीन वर्षात मास्क मिळेल. मास्कची किंमत वाढून ९० हजार येन म्हणजे अंदाजे ७० हजार रुपये हाेईल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.