आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:ऑस्ट्रेलियात आढळले विक्रमी 747 रुग्ण,19 महिन्यांनंतर सर्वाधिक रुग्ण; 30 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

सिडनी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑस्ट्रेलियात गुरुवारी कोरोनाचे ७४७ नवे रुग्ण आढळून आले. १९ महिन्यांतील हा सर्वात मोठा आकडा ठरला आहे. बहुतांश रुग्ण सिडनीचे आहेत. हे लक्षात घेऊन लॉकडाऊनला ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आले आहे. त्याशिवाय काही शहरांत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

घरातून बाहेर पडताना तोंडाला मास्क लावावा असे आवाहन ऑस्ट्रेलियाच्या सरकारने जनतेला केले आहे. अमेरिकेत गुरूवारी १.५४ लाख नवे रुग्ण आढळून आले आहेत. २५ जानेवारीनंतरची ही सर्वात मोठी रुग्णसंख्या आहे. अमेरिकेच्या तुरुंगातही महामारीचा फैलाव वाढला आहे. देशभरातील तुरुंगात संसर्गाचा दर वाढून तो ३४ टक्क्यांवर गेला आहे. तूर्त तरी अमेरिकेतील तुरुंगामध्ये असलेली परिस्थिती चांगली नाही. तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांचा तुरुंगात भरणा केलेला आहे. न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा एक रुग्ण आढळल्यानंतर तीन दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. तो शुक्रवारपर्यंत वाढवण्यात आला आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यूझीलंडने महामारीच्या बाबतीत काटेकाेरपणे नियमांचे पालन केले आहे. त्यामुळे महामारीवर नियंत्रण मिळवता आले आहे.

बातम्या आणखी आहेत...