आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर अमेरिकेतील देश मेक्सिकोत १ ऑगस्टला महत्त्वाची जनमत चाचणी होईल. यात देशाच्या पाच माजी राष्ट्रपतींविरोधात भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या आरोपात खटला चालवायचा की नाही याचा निर्णय मतदार घेतील. विरोधकांनी याला घटनेची पायमल्ली म्हणत खटला दाखल करण्याचा निर्णय सरकार पक्षाने करायला हवा, लोकांनी नव्हे. तर एका गटाचे म्हणणे आहे की, ही जनमत चाचणी खटल्याचा तमाशा आहे. तो सध्याचे राष्ट्रपती आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्रेडोर यांनी तयार केला आहे. याबाबत ओब्रेडोर म्हणाले, मी मत देणार नाही. मी सुडाची भावना ठेवत नाही. खटला चालवायचा की नाही हे लोकांनी ठरवायचे. देशात ३० वर्षे भ्रष्ट सरकारे होती. घोटाळे व निवडणुकीत फसवणूक केली. ड्रग्ज रोखण्यात अपयशी ठरले. यामुळे देशात हिंसाचार वाढला. या सरकारांची कृत्ये उघड करण्यासाठी मी राष्ट्रपती झालाेय.
२०१८ मध्ये मोठ्या विजयानंतर ओब्रेडोर राष्ट्रपती झाले होते. तेव्हापासून ते माजी राष्ट्रपतींवर खटला चालवण्यासाठी जनमत चाचणीवर भर देत आहेत. जनमत चाचणीला पुढील निवडणुकीची चाचणी म्हटली जात आहे. लाेक त्यांच्यासोबत किती आहेत हे ओब्रेडोर यांना जाणून घ्यायचे असून त्याआधारे इतर निर्णय घेतील. यातील एक महत्त्वाचा निर्णय मेक्सिको सिटीत अर्धे तयार विमानतळ रद्द करणेही आहे.
नऊ महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाची जनमत चाचणीला परवानगी
ऑक्टोबर २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जनमत चाचणीला परवानगी दिली होती. यात माजी राष्ट्रपती कार्लोस गोर्टारी (१९८८-१९९४), अर्नेस्टो जेडिलो (१९९४-२०००), विसेंट फॉक्स (२०००-२००६), फेलिप काल्डेरन (२००६-२०१२) आणि एनरिक पेना नीटो (२०१२-२०१८) यांच्यावर खटल्याचा निर्णय होईल. दोषी सिद्ध झाल्यास माजी राष्ट्रपतींना शिक्षा द्यायची की नाही याचाही निर्णय होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.