आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटनमध्ये हवामान खात्याने थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा देताच सैंधव मिठागारांमध्ये तयार माल घेऊन जाण्याची लगबग पाहायला मिळाली. कारण बारीक केलेले मीठ बर्फवृष्टीनंतर आर्द्रतेमुळे खराब होण्याची शक्यता जास्त असते. त्याचा मोठा आर्थिक फटकाही बसू शकतो. २००९ आणि २०१० मध्ये झालेल्या वादळी बर्फवृष्टीने तेव्हा सैंधव मिठाच्या उद्योगाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर मात्र देशात थंडी आणि बर्फवृष्टीचा वेध घेऊन त्यादृष्टीने पूर्वतयारी केली जाते. दक्षता घेतली जाते. विन्सफोर्ड येथील कॉम्पास मिनरल्समध्ये लगबग दिसून आली.
हिवाळ्यात मागणीत वाढ
ब्रिटनमध्ये सरासरी १.५ दशलक्ष टन मिठाची मागणी असते. परंतु अत्यंत प्रतिकूल वातावरणात मात्र दुपटीवर जाते.
५,००,००० टन एवढा सरासरी साठा येथील खाणीच्या परिसरात.
१५००० टन सैंधव मिठाचे सरासरी उत्पादन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.