आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना:अमेरिकेत ऑक्टोबरसारखी स्थिती, आता सर्वच राज्यांत मास्क अनिवार्य : जो बायडेन

वॉशिंग्टन6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोज 63 हजार रुग्ण, 20 टक्के लोकांचे लसीकरण

अमेरिकेत कोरोनाबाधित वाढत असल्याने चिंताग्रस्त अध्यक्ष जो बायडेन यांनी सर्व राज्यांना तसेच शहर प्रशासनाला मास्क अनिवार्यपणे लागू करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, बेपर्वाई दिसून आल्यास भविष्यात परिस्थिती अत्यंत भयावह होऊ शकते. तूर्त अमेरिकेतील १६ राज्यांत मास्क अनिवार्य नाही. ३१ राज्यांत तो बंधनकारक आहे. ३ राज्यांत अंशत: हा नियम लागू आहे. कोरोना विषाणूवर विजय संपादन केला आहे, अशी देशातील असंख्य लोकांची धारणा आहे. परंतु त्यांनी ही धारणा बदलली पाहिजे. कारण असा विचार करणे घाईचे ठरेल, असे बायडेन यांनी सांगितले. व्हाइट हाऊसच्या मीडियासंबंधी केंद्रात आयोजित कार्यक्रमात रोग नियंत्रण केंद्राच्या संचालक डॉ. वालेन्स्की कोविड-१९ संंबंधी अनुभव सांगताना भावुक झाल्या होत्या. कोविडच्या चौथ्या लाटेबद्दल त्यांनी लोकांना इशारा दिला. आपल्याला भविष्यात खूप काही गोष्टी करायच्या आहेत. खूप प्रकारच्या आशा आहेत. परंतु भविष्यातील स्थिती आणखी वाईट होईल, असे मला वाटू लागले आहे.

न्यूयॉर्क टाइम्सच्या डेटाबेसनुसार रविवारी देशात ६३ हजार रुग्ण आढळून आले. याआधी एवढी रुग्णसंख्या ऑक्टोबरमध्ये दिसून आली होती. दोन आठवड्यांपूर्वी संख्या सरासरी ५४ हजार होती. म्हणजे नव्या रुग्णांचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत वाढू शकते. असाच पॅटर्न युरोपातही पाहायला मिळू शकतो. अमेरिकेत लसीकरण मोहीम व कोरोनाच्या नव्या स्वरूपातील विषाणू यांच्यात जणू शर्यत सुरू आहे, असे देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटते. तसे तर अमेरिकेतील एक तृतीयांश लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. २० टक्के लोकसंख्येला दोन डोस मिळाले. असे असतानाच अमेरिकेतील लोक कोरोनासंबंधी केलेल्या उपाययोजनांवर समाधानी आहेत. एबीसी, इप्सास पोलनुसार ७२ टक्के लोकांनी बायडेन प्रशासनाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केले. ७५ टक्के लोक लसीच्या वितरण पद्धतीवर नाराज आहेत.

जंतूमार्फत बाधा शक्य : आरोग्य संघटना
मानवाला कोविड-१९ ची बाधा वटवाघळाकडून इतर जंतूमार्फत झाली असावी, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेच्या चीन भेटीवरील टीमने लावला आहे. अलीकडेच या टीमने कोरोनाची उत्पत्ती शोधण्यासाठी चीनला भेट दिली होती.
महामारीचा मुकाबला करण्यासाठी जागतिक पातळीवरील कराराची गरज आहे, असा विचार ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मन चान्सलर अँगेला मर्केल यांनी संयुक्तपणे जाहीर केला. सगळे सुरक्षित होईपर्यंत कुणीही सुरक्षित नाही, हा धडा कोरोनाने आपल्याला दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...