आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष:इतरांना केलेली छोटीशी मदत आपले जीवन बदलते,  पण ‘लोक काय म्हणतील?’ या विचाराने आपण मदत करत नाही

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये झालेले संशोधन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजीत प्रसिद्ध

तुमची दयाळू भूमिका, कोणाला केलेली छोटीशी मदत फक्त तुम्हाला किंवा मदत मिळणाऱ्यालाच नाही, तर संपूर्ण समाजाला आनंद देऊन जाते. जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल सायकॉलॉजीत प्रकाशित नव्या शोधानुसार, आपण बरेचदा इतरांना मदत करू शकण्याच्या स्थितीत असूनही ती व्यक्ती किंवा इतर काय म्हणतील असा विचार करून मागे हटतो. मॅरिसा फ्रँको या मानसशास्त्रज्ञ सांगतात की, आपण आपल्या वर्तणुकीच्या सकारात्मक पैलूकडे लक्ष देत नाही. मदतीसाठी समाजात समोर येण्याची जेव्हा खरी गरज असते तेव्हा मनात नकारात्मक विचार येऊ लागतात. अशा प्रकारच्या अभ्यासात ही बाब सिद्ध झाल्यानंतर लोकही संकोच सोडतील आणि समाजातील ज्ञात-अज्ञात लोकांना मदत करतील.’

या अभ्यासासाठी ८ वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. एका प्रयोगात पदवीधर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना लोकांना मदत करण्यास सांगण्यात आले. त्यात घरून कॉलेजला आणणे, एखाद्याला कॉफी किंवा चहा पाजणे यांसारख्या कुठल्याही मदतीचा समावेश होता. इतर प्रयोगांत ८४ सहभागी व्यक्तींना २ दिवस थंड ठिकाणी ठेवण्यात आले. तेथे त्यांना वितळलेले चॉकलेट देऊन सांगण्यात आले की, एक तर ते स्वत: खाऊ शकतात किंवा इतर कोणाला देऊ शकतात. त्यापैकी ७५ जणांनी आपले चॉकलेट इतरांना दिले. नंतर त्यांना रेटिंग करण्यास सांगून त्यांनी ज्याला चॉकलेट दिले त्याला कसे वाटले असेल, अशी विचारणा करण्यात आली. त्यात जे सामान्यत: लोकांना मदत करत असतात त्यांना ही फार मोठी गोष्ट नाही असे वाटले. याउलट जे लोक इतरांना मदत करत नाहीत त्यांना असे वाटले की, ज्यांना चॉकलेट मिळाले ते लोक खूप खुश असतील. युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासचे मार्केटिंग आणि मानसशास्त्र विभागाचे प्रोफेसर अमितकुमार या संशोधनात सहभागी होते. ते म्हणाले की, आपण ज्याला मदत करतो त्याला काय वाटले असेल याचे चुकीचे आकलन आपल्याला मदत करण्यापासून रोखते. अशा प्रकारचे अनेक प्रयोग केल्यानंतर डॉ. अमितकुमार म्हणाले की, ज्यांना मदत करण्यात आली ते यामुळे खूप प्रभावित झाले, पण मदत करणाऱ्यास त्याची जाणीवच नव्हती.

लोकांना दयाळूपणा हवा असतो, पण त्याच्या विचारानेच ते अस्वस्थ होतात मित्रांशी भेट-संवाद, एवढेच नव्हे तर मोबाइलवर मिळालेल्या संदेशामुळेही आपल्याला समाधान वाटते. लोकांना मदत करण्यातही एवढीच ताकद असते असे नव्या अभ्यासातून स्पष्ट झाले. इतरांना केलेली मदत, मग ती कितीही छोटी असली तरीही, तणाव कमी करते. वैद्यकीय मानसशास्त्रज्ञ तारा कौझिनौऊ म्हणतात की, लोकांना दयाळूपणा हवा असतो. तरीही नेहमीच दयाळूपणा दाखवण्याच्या विचाराने ते अस्वस्थ होतात. दयाळूपणा एक आवेग आहे, जेव्हा मनात हा विचार येतो तेव्हा आपण फारच विचार करतो. जेिनफर ओल्डहॅम यांच्या मुलीचा एका अपघातात मृत्यू झाला. त्या इतरांना खूप मदत करतात. इतरांना मदत केली तर आपल्याला समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...