आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:थंड पदार्थांमुळे दातांमध्ये होणाऱ्या वेदनेचे कारण पेशींमध्ये असणारे एक विशेष प्रोटीन, आता त्याच्यावर करता येतील उपचार

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या संशोधनात तज्ञांनी शोधले कारण, टीआरपीसी- ५ आहे जबाबदार

आइसक्रीम खाताना किंवा शीतपेय पिताना दातात होणाऱ्या वेदना सर्वांनाच माहिती आहेत. थंड- उष्ण यामुळे दातांशी संबंधित या वेदना नेहमीच लोकांना त्रास देतात. संशोधकांना माहिती आहे की, या समस्येमुळे दातांच्या बाहेरच्या सुरक्षात्मक थराचे नुकसान होत असते. मात्र, ते दाताच्या नसांपर्यंत कसे पोहोचते हे त्यांना समजत नव्हते. मात्र, जर्नल सायन्स अॅडव्हान्समध्ये प्रसिद्ध एका संशोधनानुसार, बायोलॉजिस्टने आता या तीव्र व अचानक होणाऱ्या वेदनेचे कारण शोधले आहे. संशोधकांच्या नुसार याचे मुख्य कारण एक विशेष पिताना आहे जे दातांच्या आतील पेशींच्या पृष्ठभागावर असते. त्यांच्या नुसार, या माहितीमुळे लवकरच या विशेष प्रकारच्या वेदनेवर उपचार शोधता येतील.

सुमारे एक दशकापूर्वी जर्मनीतील फ्रेड्रिक अलेक्झांडर विद्यापीठाच्या प्राध्यापक डॉ. कॅथरीना जिमरमॅन यांनी सांगितले होते की, पेशी एक विशेष प्रकारचे टीआरपीसी-५ नावाचे प्रोटीन तयार करतात, ज्या थंडीबाबत संवेदनशील असतात. त्यांचा जेव्हा थंड पदार्थांशी संपर्क होतो, तेव्हा एक चॅनल तयार करून कणांच्या पडद्यापलीकडे प्रवाहित होऊ लागतो.

डॉ. जिमरमॅन यांच्या नुसार, हे प्रोटीन (टीआरपीसी-५) कण पूर्ण शरीरात प्रवाहित होऊ लागतात आणि यामुळेच झिणझिण्यांसारखी स्थिती तयार होते. उदाहरण म्हणजे, तुमच्या डोळ्यांना थंड हवेत थंड किंवा कोरडेपणा जाणवतो, हा कॉर्नियात प्रोटीन कण सक्रिय होण्याचा परिणाम आहे. या निकालानंतर जिम्मरमॅन या निर्णयापर्यंत आल्या की, शरीराच्या इतर भागांतही टीआरपीसी- ५ सारखे थंड रिसेप्टरचा उपयोग होऊ शकतो, यात मानव शरीरातील सर्वात संवेदनशील उतींपैकी एक दातही असू शकतो, ज्यात थंडपणा जाणवतो. अनेक लोकांमध्ये ही जाणीव तीव्र आणि टोचणाऱ्या वेदनेच्या रूपानेही होते, जी आतापर्यंत सर्वात मोठी समस्या आहे.

दातांमध्ये थंडपणा जायचे कारण तज्ञांना माहिती नव्हते
आतापर्यंत दातांमध्ये थंडपणा कसा जातो, हे जाणून घेण्याचा प्रचलित सिद्धांत होता की, तापमानातील बदलामुळे दातांच्या आतील तरल पदार्थांवर दबाव पडतो, तो लपलेल्या नसांमध्ये प्रतिक्रिया सक्रिय करतो. मात्र हे कसे होते, याबाबत सविस्तर माहिती नव्हती. डॉ. जिमरमॅन यांनी उंदरांवरही टीआरपीसी- ५ प्रोटीनचा प्रभाव पाहिला होता.

बातम्या आणखी आहेत...