आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन:30 वर्षांत 10 कोटी शब्दांचे अध्ययन, सोशल मीडियात इंग्लिश व्याकरण संपण्याच्या मार्गावर

लंडन19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साेशल मीडियावर मेसेजिंगद्वारे संवादात अनेक पटीने वेग आला आहे. गेल्या काही वर्षांत साेशल मीडियात इंग्लिश व्याकरण संपण्याच्या मार्गावर दिसते. ट्विटर सारख्या आॅनलाइन प्लॅटफाॅर्मवर शब्दमर्यादा आहे. इंग्लिश व्याकरणातील अपाॅस्ट्राेपी एस (’s) जवळपास संपल्यासारखा आहे. युजर आता इंग्लिशची प्रमाणित भाषा वापरत नाहीत. अनेक वचनासाठी वापरल्या जाणाऱ्या अपाॅस्ट्राॅपी एस एेवजी लाेक एस जाेडून लिहू लागले आहेत. ब्रिटनच्या लँकेस्टर विद्यापीठातील ताज्या पाहणीतून हे दिसून आले आहे. या संशाेधन प्रकल्पाचे प्रमुख डाॅ. वॅलकॅव ब्रिजिनिया म्हणाले, आम्ही गेल्या तीन दशकांच्या काळात माेठ्या प्रमाणात तंत्रज्ञानसंबंधी बदल पाहिला आहे. तंत्रज्ञानाने आपल्या संवाद पद्धतीलाही बदलून टाकले आहे.

लिखित भाषा आता आणखीनच क्रियाशील झाली आहे. तुम्ही लिहिलेले काही क्षणांत जगभरात वाचले जाऊ शकते. साेशल मीडियात इंग्लिश मुळाक्षरांचा सर्वाधिक वापर केला जाताे. इंग्लिश व्याकरणाएेवजी नव्या पद्धतीने शब्द लिहिण्यास प्राेग्रेसिव्ह स्पेलिंग म्हटले जाते. या पद्धतीला इंग्लिश विद्वानांनी विराेध केला आहे. ही बाब इंग्लिशच्या भवितव्यासाठी चांगली नाही, असे त्यांना वाटते.

तंत्रज्ञानाशी संबंधित वी लाॅक, फिटबिट, बिटकाॅइनसारखे शब्द इंटरनेटवर लाेकप्रिय
तंत्रज्ञानाशी संबंधित वीलाॅट, फिटबिट व बिटकाॅइनसारखे शब्द इंटरनेटवर लाेकप्रिय आहेत. इंटरनेटच्या आधी हे शब्द प्रचलित नव्हते. अनेकवचनासाठी वापरल्या जाणाऱ्या एस प्रत्ययाचा वापर साेशल मीडियावरील करणाऱ्या लाेकांचे प्रमाण ८ टक्के आहे. whom (हूम) शब्दाचा उपयाेग ५२ टक्के, shall (शॅल) चा वापर ६० टक्के एवढा हाेताे. Mr. आणि Mrs. चा वापरही खूप कमी झाला आहे. थेट नावानेच संबाेधले जाते. प्रति दहा लाख शब्दांमध्ये amazing (अमेझिंग) या शब्दाच्या वापराचे प्रमाण ६०० टक्के वाढले आहे.

बातम्या आणखी आहेत...