आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Ukrain Russia Waar | Ukraine School Update | A Teacher Prepares To Teach Again At A School Destroyed By Explosions In Ukraine

युक्रेनमध्ये स्फोटांमुळे नष्ट शाळेत पुन्हा शिकवण्याच्या तयारीत शिक्षिका:81 वर्षीय क्रूपचेंको विखुरलेली पुस्तके एकत्र करण्यात मग्न

​​​​​​​क्रेमातोर्स्क (युक्रेन)25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे छायाचित्र आहे युक्रेनमधील एका शाळेचे. रशियाच्या हल्ल्यानंतर ही शाळा नष्ट झाली. पण 81 वर्षीय रायसा क्रूपचेंको स्फोटांमुळे विखुरलेली पुस्तके एकत्र करण्यात मग्न आहेत. रशियन हल्ल्यात अशा अनेक शाळा नष्ट झाल्या आहेत.

दुसऱ्या छायाचित्रात शिक्षिका व्हिक्टोरिया पोलियाकोव्हा हल्ल्यातून वाचलेली उपकरणे जमा करत आहेत. तिसऱ्या छायाचित्रात मिकोलेव्हमधील एका शाळेत प्रकाशाची तात्पुरती व्यवस्था करण्यासाठी प्राचार्या ओक्साना कपिका आपल्या शिक्षकांशी चर्चा करून योजना आखत आहेत. शाळांत वीज, पाणी, टेबल-डेस्क आणि इमारतीची दुरुस्ती ही शिक्षकांसमोरील आव्हाने आहेत. तरीही शिक्षकांनी मात्र धीर सोडलेला नाही. उपलब्ध साधनांच्या आधारे ते शिक्षण पुढे चालू ठेवण्यासाठी धडपडत आहेत.

यातून स्पष्ट संदेश असा...

परिस्थिती कितीही कठीण असो, शिक्षक कधीच हार मानत नाहीत. मुलांनाही ते हार मानू देत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...