आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर कसे नियंत्रण कसे मिळवाल:तिसऱ्या लाटेने ग्रासलेल्या इस्रायलला गतिमान लसीकरणाने उभारी; 62% लोकसंख्येने घेतली लस, मुलांसाठी तयारी सुरू

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन्ही डोस घेतलेले इस्रायली नागरिक मास्कशिवाय कोठेही जाऊ शकतात; शॉपिंग मॉल, जिमदेखील झाले खुले

तिसऱ्या लाटेशी तीव्र लढा दिल्यानंतर इस्रायलने केलेले पुनरागमन हे काेणत्याही देशासाठी एक चांगले उदाहरण ठरू शकते. शीघ्र लसीकरण माेहिमेमुळे या देशातील नागरिकांना पुन्हा एकदा माेकळ्या हवेत श्वास घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात अाले अाहे. फेब्रुवारीपासून अर्थव्यवस्थाही खुली हाेत चालली अाहे. लसीकरणातील दाेन्ही डाेस घेतलेल्या लाेकांसाठी शाॅपिंग माॅल अाणि व्यायामशाळा खुल्या झाल्या अाहेत. त्यांना सांस्कृतिक कार्यक्रमातही भाग घेण्याची सूट दिली अाहे. सगळ्यात शेवटी म्हणजे शाळाही उघडल्या असून देशाची संपूर्ण लाेकसंख्या अाता विनामास्क काेठेही जाऊ -येऊ शकते. परंतु बंद ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक अाहे. लस घेतलेली नाही अाणि काेराेना संसर्गही झालेला नाही अशा लाेकांनाही सवलत देण्यासाठी अाराेग्य मंत्रालयाने मे महिन्यात याेजना अाखण्यास सुरुवात केली अाहे.

हर्ड कम्युनिटीपर्यंत पाेहोचण्याच्या संकल्पनेतून इस्रायलमध्ये वाढत्या संसर्गाचे प्रमाण झपाट्याने घटले अाहे. निम्म्याहून जास्त लाेकसंख्येचे लसीकरण झाले अाहे. त्याचबराेबर रेड झाेन (सर्वाधिक संसर्गग्रस्त भाग) शहरातही शून्य प्रकरणे नाेंद हाेत अाहेत. परंतु त्याच वेळी काेराेनाच्या नव्या प्रकरणांवरही नजर ठेवली जात अाहे. विविध भागांतील शाळांमध्ये काेविडची नवीन प्रकरणे अाढळून अाली अाहेत. अाता लहान मुलांच्या लसीकरणाची तयारी सुरू अाहे. लसीची अाॅर्डरही दिली अाहे. अाता फक्त एफडीएच्या मंजुरीची प्रतीक्षा अाहे. या दरम्यानच इस्रायलमध्ये भारतीय प्रकाराचे ४० रुग्ण अाढळून अाले अाहेत. त्यामुळे ३ मेपासून ब्राझील, इस्रायल, दक्षिण अाफ्रिका, भारत, मेक्सिकाे अाणि तुर्की या सात ठिकाणांहून येणाऱ्या प्रवेशासाठी नवीन क्वाॅरंटाइन नियम लागू करण्यात येत अाहेत.

कडक लॉकडाऊन ते माेकळा श्वास घेईपर्यंतची इस्रायलची वाटचाल
सक्ती
: ३ कडक लाॅकडाऊन, लोकांची नाराजी असतानाही सरकारने या नियमांत सूट दिली नाहीगेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये काेराेना इस्रायलमध्ये अाला. त्यानंतर देशात सार्वजनिक आरोग्याचे नियम, रेड झोनमध्ये कडक निर्बंध व तीन वेळा देशव्यापी लाॅकडाऊन झाले. तिसऱ्या लाटेत रोज सरासरी १० हजार नवीन रुग्ण येत हाेते. सरकारविरोधातील असंतोष असताना संसर्गाच्या परमाेच्च बिंदूपासून ते लसीकरणाच्या सुरुवातीपर्यंत कडक नियमांची अंमलबजावणी केली. निम्म्या लाेकसंख्येचे लसीकरण झाल्यावर अाता हळूहळू सूट देण्यात येत अाहे.

वेग ः जगातील सर्वात वेगवान लसीकरण माेहीम, ६२ टक्के लाेकसंख्येने घेतले दाेन्ही डाेस
इस्रायलमध्ये ६२ % लाेकसंख्येचे लसीकरण झाले अाहे. अाराेग्य मंत्रालयाचे महासंचालक चेजी लेव्ही म्हणाले, जगातील सर्वात वेगवान लसीकरणामुळे मृत्युदर व संसर्ग यात घट झाली अाहे. अातापर्यंत १,५०० पेक्षा कमी सक्रिय रुग्ण असून त्यापैकी ११० गंभीर अाहे. हा परिणाम बघता अाता लाॅकडाऊन हाेणार नाही. १६ वर्षे वयाच्या मुलांना लस देण्यासाठी अन्न व अाैषध प्रशासनाकडून मंजुरी मिळ‌ण्याची प्रतीक्षा अाहे.

दूरदृष्टी : लसीच्या बदल्यात फायझरबरोबर डेटा शेअरने चित्र पालटले, दुप्पट किमतीला डोसची खरेदी लसीच्या बदल्यात फायझरबरोबर डेटा शेअर करणे इस्रायलमधील जनतेसाठी वरदान ठरले. याअंतर्गत फायझरचा डाेस सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने सरकारने नागरिकांना लसीकरणासंदर्भात ‘रिअल लाइफ डेटा’ दिला. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जलद लसीकरणासाठी इस्रायलला जागतिक मॉडेल बनवले. माध्यमांच्या वृत्तानुसार, लसीचा तुटवडा हाेऊ नये म्हणून इस्रायलने ३० डाॅलरच्या हिशेबाने दुप्पट पैसे देऊन प्रत्येक लस खरेदी केली.

पुढची तयारी : बूस्टर डाेस व मुलांच्या लसीकरणासाठी अतिरिक्त लाखाे लसींची अाॅर्डर
पंतप्रधान नेतन्याहू अाणि अाराेग्यमंत्र्यांनी फायझर अाणि माॅडर्नाबराेबर करार झाल्यानंतर जास्तीच्या लाखाे लसी येण्याच्या वाटेवर असल्याची घाेषणा केली अाहे. काेराेना विषाणू अायुक्त प्रा. नचमन एेश म्हणाले, १६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांंना लस देण्यासाठी डाेसची अावश्यकता भासेल, तर अतिरिक्त डाेसचा उपयाेग तिसरा डाेस वा बूस्टर शाॅटसाठी केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...