आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन वर्षांचा मुलगा जाणताे पैशांची ताकद:7 ते 9 या वयात आर्थिक व्यवस्थापन शिकवल्यास समजेल बचतीची सवय व खर्चातील आनंद

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बहुतेक पालकांना काळजी वाटते की त्यांच्या मुलांना पैशाची किंमत समजत नाही. वस्तुस्थिती अशी आहे की, मुलांना पैसा जाेडण्याच्या युक्त्या शिकवण्याकडे ते स्वतःच दुर्लक्ष करत आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की पैसे-व्यवस्थापन हा जीवनातील एक महत्त्वाचा पैलू आहे आणि पालकत्वातील मोठी जबाबदारी आहे. मुलांना पैशाची ताकद वयाच्या ३ व्या वर्षापासून समजू लागते, परंतु ७ ते ९ हे वय मुलांना पैशाचे व्यवस्थापन शिकवण्यासाठी सर्वोत्तम वय आहे.

क्लिफ्टन कॉर्बिन, बेथ कॉबलिंगर, डाउग नॉर्डमन और राॅन लिबर हे बालकांच्या पैसे व्यवस्थापनाचे तज्ज्ञ आहेत. ते म्हणतात, ७ ते ९ वर्षे वयाच्या मुलाला पॉकेटमनी देणे सुरू करा. त्याला पैसे वाचवण्याची गरज व ते खर्च करण्यातील आनंद अनुभवण्यास शिकवा. क्लिफ्टन कॉर्बिन यांनी त्यांच्या ‘युअर किड्स, दअर मनी’ या पुस्तकात म्हटले आहे, मुलांना पॉकेटमनीबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ द्या. ते काय आणि का खरेदी करत आहेत यावर फक्त लक्ष ठेवा. तुम्ही किती बचत करत आहात? चुका होत असतील तर होऊ द्या. यानंतर त्यांना चुकीचे परिणाम समजावून सांगा. अशा व्यावहारिक धड्यांमुळे ते पैशाचे अर्थशास्त्र समजून घेतील. फेलन म्हणतात, मुले फक्त पैसे देऊन मनी मॅनेजमेंट शिकत नाहीत. त्यांच्या इच्छा आणि योजना जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. मग त्यांच्यासोबत बसून खर्च आणि बचतीचा तक्ता बनवा. महागड्या वस्तू खरेदी करण्याचेही ध्येय ठेवा. परंतु लक्षात ठेवा की त्यासाठी बचत होण्यास आठवडे किंवा महिने लागू शकतात. या संयमाने त्यांना बचत करण्याची सवय लागेल आणि महागड्या वस्तू खरेदीचा आनंदही मिळेल. ज्या मुलांवर पैसे वाचवण्यासाठी दबाव येतो किंवा पालक त्यांच्याकडून पैसे घेतात, ते पैसे लपवू लागतात.

पैशांचे व्यवस्थापन शिकण्यास मुलांना पॉकेटमनी खर्चाचा निर्णय घेऊ द्या
तज्ज्ञ म्हणतात- मुलांना पॉकेटमनी देण्यासाठी तीन मार्गांचा अवलंब करता येताे :
{कामासाठी किंमत- मुलांना घरकामांची काही जबाबदारी द्या, जसे की दररोज पलंग आवरणे, झाडांना पाणी देणे अशी कामे नियमित केल्यावर त्याला दरमहा ठराविक रक्कम द्या.
{यशासाठी बक्षिसी- दुसरा मार्ग म्हणजे मुलांना काहीतरी साध्य केल्याबद्दल बक्षीस देणे, जसे शाळेत प्रथम येणे, चांगले गुण मिळवणे, खेळात चांगली कामगिरी करणे किंवा चांगल्या वर्तनासाठी.
{दुहेरी निधी देणे - यामध्ये मुलांना दर महिन्याला किंवा आठवड्याला कोणतेही काम न करता ठराविक पैसे दिले जातात. तसेच, त्याला काही कामाच्या बदल्यातही पैसे दिले जातात.

बातम्या आणखी आहेत...