आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादैनिक भास्करशी विशेष करारांतर्गत ५३ वर्षीय लोसिफ यांचा जीवनात तीन गोष्टींशी संबंध आला आहे. आघात, मानसिक दुरावा आणि मानसिक समस्या. मूळचे रोमानियातील लोसिफ यांना बेल्जियमने आश्रय दिला नाही. नंतर घटस्फोट व आर्थिक संकटाचा त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. परंतु ते डायनिंग टेबलवर बसतात, काचांतून बाहेर डोकावतात तेव्हा ते शांत वाटतात. बाहेर ड्राॅइंग रूममध्ये त्यांच्यासारख्या ७१ वर्षीय एटी व ७५ वर्षीय ल्यू मुलांसोबत कार्टून बघताना त्यांना दिसतात. हे सगळे वृद्ध कोणत्या ना कोणत्या मानसिक आजाराने ग्रस्त आहेत. बेल्जियमच्या जील शहरात ४७ वर्षीय ब्यूटिशियन एन आपल्या मुलासह राहतात. जील शहरात अशी अनेक घरे आहेत. तेथे मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्यांना मदत केली जाते. या मदतीला प्राचीन परंपरा आहे. जीलमध्ये १३ व्या शतकापासून अशा लोकांना मायेची सावली देण्याची परंपरा जोपासण्यात आली आहे.
१३०० च्या मध्यात मानसिक सुरक्षेसाठी काम करणारे संत डिम्फना यांच्यासाठी एक चर्च बनवण्यात आले. तेव्हा मानसिकदृष्ट्या त्रस्त असलेले लोक जीलला येत असत. ते स्थानिक शेतकऱ्यांच्या घरांत राहून शेतीकामात मदत करत होते. १९०० च्या अखेरीस असे किमान २ हजार लोक जील गावातील घरांत वास्तव्याला होते. आज केवळ १२० लोक आश्रयाला आहेत. या परंपरेने जीलला मानसिक देखभालीचे एक विशेष प्रतिमान म्हणून विकसित केले आहे. तसे तर या मॉडेलवरही संशयाने पाहणारा एक मतप्रवाह आहे. कारण हा आधुनिक मनोचिकित्सेच्या विरोधातील दृष्टिकोन मांडला गेला होता. प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट आेलिव्हर सॅक यांनी मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीसोबत कशा प्रकारचे वर्तन असावे हे त्यांनी आपल्या पुस्तकात नमूद केले होते. त्यांनी जीलचा दौराही केला होता.
या समस्येवरील उत्तरही त्यांनी पुस्तकातून दिले होते. मानसिक आजाराला कलंकित करणाऱ्या अक्षमतेपेक्षा व्यक्तीमत्वाच्या रुपात स्वीकारले पाहिजे, असे त्यांनी सूचवले होते. असाध्य विकाराने पीडित वाटणाऱ्या किंवा तशी शक्यता असलेल्या लोकांनाही प्रेम, सुरक्षित जीवनाचा हक्क आहे. जीलमध्ये ही बाब सिद्ध होते, असा निष्कर्ष डॉ. ऑलिव्हर यांनी काढला होता.
एनला देखील ही प्रेरणा वारशाने मिळाली. त्यांची मावशी अशा लोकांना आश्रय द्यायची. तरूण होणाऱ्या एनवर या वातावरणाचा परिणाम झाला. त्या म्हणाल्या, जीलमधील नागरिकांचा हा स्वभाव होऊन जातो. म्हणूनच सात वर्षांपूर्वी या प्राचीन परंपरेत सहभागी होताना अशा लोकांना आश्रय द्यायचा की नाही, हा प्रश्नही मनात आला नाही. उलट किती जास्त लोकांना मदत करता येईल, याबद्दल त्या विचार करत होत्या. चार लोक असले तरीही मला अडचण नसेल. परंतु एका कुटुंबात तीन पेक्षा जास्त लोकांना मदतीची परवानगी नाही. मला आजुबाजूला जास्त लोक असलेले आवडते, असे त्या सांगतात.
प्रमुख मानसतज्ञ विल्फ्रेड बोगार्ट्स म्हणाले, फोस्टरिंग प्रोग्रामसाठी रुग्णांना शोधणे आणि उपचार कठीण नाही. परंतु त्यांची स्थिती किती स्थिर आहे, हे जाणून घेणे आव्हानात्मक असते. स्किझोफ्रेनिया तसेच इतर गंभीर मनोविकार असलेले लोक जीलमध्ये आश्रयाला येतात. जीलमध्ये हे लोक एखाद्या कुटुंबात सहजपणे मिळून-मिसळून जातात. अशा लोकांना बोर्डर्स म्हटले जाते. मंजुरी मिळालेल्या बोर्डर्सला काही कुटुंबांची आेळख करून दिली जाते, असे बोगार्ट्स यांनी सांगितले. बोर्डरची मंजुरी मिळत नाही तोवर अशा कुटुंबांना बोर्डर्सच्या आजाराबद्दलची माहिती दिली जात नाही. कार्यकर्ते कुटुंबांवर लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे कशा प्रकारचे वर्तन अपेक्षित आहे याची माहिती त्यांना मिळते. त्याशिवाय आैषधाची नियमितता आणि कसलाही त्रास जाणवल्यास सतर्क करण्याबाबतही शिकवले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.