आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इराणच्या सामुद्रधुनीतील ७०० वर्षांपूर्वीचे हार्म्युझ बेट आकर्षणाचे केंद्र बनले आहे. बेटावरील लोकसंख्या ६ हजार आहे. परंतु दरवर्षी या बेटाला १० लाखांहून जास्त पर्यटक भेट देतात. मात्र महामारीमुळे येथील पर्यटन व्यवसाय ठप्प झाला आहे. आता स्थानिक लोकांनी हार्म्युझ बेटाला फुलवण्याचा संकल्प केला. त्यासाठी बेटावरच रंगीबेरंगी गाव वसवले. त्याला नाव दिले - कार्टून व्हिलेज. या गावात लहान-मोठे मिळून सुमारे २०० घुमट असलेली घरे आहेत. त्यापैकी ८५ घरांत स्थानिक लोक राहतात. ८५ घरे पर्यटकांसाठी आहेत. उर्वरित ३० घरांत रेस्तराँ, कॅफे, दुकाने, स्पा, आर्ट गॅलरी व प्रार्थनास्थळे आहेत. एखादा पर्यटक आल्यास एका रात्रीसाठी २० डॉलर म्हणजेच सुमारे १४५० रुपये द्यावे लागतात. या घरांत लक्झरी सुविधाही आहेत.
४० टक्के वाहतूक
१२९० मध्ये सापडलेले हार्म्युझ बेट ४८ किमी क्षेत्रफळ आहे. हार्म्युझ सामुद्रधुनी इराणच्या दक्षिण भागात आहे. पर्शियन खाडी व आेमानची खाडी यांना जोडणारा हा चिंचोळा असा प्रमुख जलमार्ग आहे. जगातील ४० टक्के तेल व नैसर्गिक गॅसची वाहतूक याचमार्गे केली जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.