आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:146 किलो वजनाच्या महिलेने लॉकडाऊनमध्ये आहाराद्वारे घरीच घटवले 60 किलो वजन!

लंडन25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीमुळे महिलेची खायखाय करण्याची सवय सुटली

जगभरात कोरोना महामारी व त्यास नियंत्रित करण्यासाठी लागू लॉकडाऊनमध्ये हैराण आहे. परंतु आयर्लंडच्या डब्लिन येथील कार्ला फिजरगार्ड (३४) यांनी लॉकडाऊनच्या काळात वैयक्तिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची कामगिरी यशस्वी केली. १४ महिन्यांपूर्वी कार्ला यांचे वजन १४६ किलो होते. या काळात त्यांनी वजन ६० किलोने घटवले. त्यासाठी त्या जिममध्ये गेल्या नाहीत. केवळ आपल्या खानपानाच्या सवयीत त्यांनी बदल केले. अतिवजन असल्याने मला अनेक प्रकारच्या त्रासांना तोंड द्यावे लागत होते. कोठेही गेल्यानंतर आपल्या आकाराची बैठक व्यवस्था त्यांनी मिळत नसे. कार्ला म्हणाल्या, फ्लाइटमध्ये बसणेही कठीण व्हायचे. कपडेही मर्यादित स्वरूपात होते. काळी लॅगिंग व बॅगी जम्पर्स एवढेच कपडे असायचे.

मला इतर कपडेही आवडायचे. परंतु ते घालता येत नसत. आधीही मी वजन नियंत्रित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. परंतु त्यात यश मिळाले नाही. कारण काही वेळ झाला की मला काहीतरी खाण्याची सवय होती. दररोज तीन ते पाच हजार कॅलरीचा आहार होता. लॉकडाऊनच्या काळात मी माझ्या सवयीवर लक्ष केंद्रित केले. लॉकडाऊनचा मला वजन नियंत्रित करण्यासाठी व स्वत:कडे पुरेसे लक्ष केंद्रित करण्यासाठी फायदा झाला. कारण दररोजच्या धावपळीत वजन नियंत्रणाबाबत मला विचार करूनही काही ठोस करता येत नव्हते.

एकदम नव्हे, हळूहळू कॅलरीत घट
कॅलरी नियंत्रित आहार घेण्यास सुरुवात केली. एकदम कॅलरीत घट करायची नाही, असे मी ठरवले. हळूहळू त्यात घट केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...