आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रँडमास्टर:12 वर्षांचा भारतीय वंशाचा अभिमन्यू ठरला जगातील तरुण ग्रँडमास्टर; वडील म्हणाले, विरोधकांना चक्रव्यूहात अडकवणे तो चांगलेच जाणतो

बुडापेस्टएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 12 वर्षे 4 महिने आणि 25 दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर होण्याचा विक्रम

भारतीय वंशाचा अमेरिकेचा बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने वयाच्या बाराव्या वर्षी इतिहास रचला. न्यू जर्सीत राहणारा अभिमन्यू बुधवारी १२ वर्षे ४ महिने आणि २५ दिवसांच्या वयात जगातील सर्वात कमी वयाचा ग्रँडमास्टर झाला. त्याने बुडापेस्टमध्ये आयोजित ग्रँडमास्टर स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर गोव्याचा १४ वर्षीय लियॉन मेनडोंका याला हरवून ही कामगिरी केली. अभिमन्यूने युक्रेनच्या सर्गे कर्झाकिन याचा १९ वर्षे जुना विक्रम मोडला. सर्गेने १२ वर्षे ७ महिन्यांच्या वयात ही कामगिरी केली होती. अभिमन्यूचे वडील डेटा अॅनालिस्ट हेमंत मिश्रा सांगताहेत मुलाची ग्रँडमास्टर होण्याची कहाणी...

कामगिरी : अभिमन्यूचा खेळ बघून जगज्जेते गॅरी कास्पारोव्ह त्याचे मार्गदर्शक व्हायला तयार झाले
अभिमन्यू अडीच वर्षाचा होता व व्यवस्थित बोलूही शकत नव्हता तेव्हा मी त्याला गोष्टींद्वारे बुद्धिबळाच्या सोगट्यांबाबत सांगायचो. तो लक्ष देऊन प्रत्येक साेंगटी व त्यांची चाल बघायचा. त्याला हा खेळ आवडतो हे माझ्या लक्षात आले. मी जेव्हा त्याला घेऊन बसायचो तेव्हा तो बुद्धिबळाचा पट माझ्याजवळ घेऊन यायचा. पाच वर्षांचा झाल्यावर मला त्याने पहिल्यांदा हरवले. दुसऱ्यांदा आव्हान दिल्यावर त्याने पुन्हा मात दिली. बुद्धिबळाची ही आवड त्याला एके दिवशी यशाच्या शिखरावर नेईल हे माझ्या लक्षात आले. स्पर्धेत खेळण्याविषयी विचारल्यावर तो तयार झाला. न्यू जर्सीत एका स्पर्धेदरम्यान त्याने त्याच्या वयापेक्षा पाचपट मोठ्या लोकांना केवळ आव्हानच दिले नाही तर हरवलेदेखील. अभिमन्यू लहान असल्याने थकून स्पर्धा सोडेल व विजयी होऊ म्हणून एक प्रतिस्पर्धी एक तास चाल चालला चालला नाही. यानंतर अभिमन्यूने कधीच कोणत्याही स्पर्धेत मागे वळून पाहिले नाही. तो त्याची रणनीती स्वत: आखतो व विरोधकांना आपल्या चक्रव्यूहात अडकवून चुका करण्यास बाध्य करतो हे त्याचे वैशिष्ट्य आहे. जगज्जेता कास्पारोव्हने त्याच्या फाउंडेशनसाठी ९ वर्षांचा असताना अभीचा खेळ बघून त्याचा मार्गदर्शक होण्याचे मान्य केले तो दिवस माझ्या आयुष्यातील चांगला दिवस होता. २०१८ मध्ये कास्पारोव्हने त्याच्या खेळाचे विश्लेषण केले तेव्हा मला विशेष करून बोलावण्यात आले होते. ही सुरुवात आहे... त्याच्या अनेक चाली अद्याप बाकी आहेत.

बातम्या आणखी आहेत...