आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्भपाताचा अधिकार:गर्भपाताच्या अधिकाराचा मुद्दा बायडेनसाठी ठरू शकतो ‘संजीवनी’

वॉशिंगटन15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भपाताच्या घटनात्मक अधिकाराशी संबंधित ५० वर्षे जुना निर्णय अमेरिकन सुप्रीम कोर्ट फिरवू शकते. सुप्रीम कोर्टाचा याच्याशी संबंधित एक मसुदा लीक झाला आहे. प्रसार माध्यमात लीक झालेल्या या मसुद्यानुसार, गर्भपाताचा अधिकार संपवण्याची तयारी सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने १९७३ च्या रो विरुद्ध वेड प्रकरणातील निर्णय फिरवण्यासाठी मतदान केल्याचे या मसुद्यात म्हटले आहे.

याविरोधात अमेरिकेत आंदोलने होत आहेत. तर माध्यमातील वृत्तानुसार, मध्यावधी निवडणुकीपूर्वी हा मसुदा लीक होणे राष्ट्रपती जो बायडेन यांच्या पक्षासाठी ‘संजीवनी’ ठरू शकते. पडद्यामागे काही रिपब्लिकनही खुश आहेत. कारण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे गर्भपाताचा अधिकार संपुष्टात येऊ शकतो आणि अनेक राज्यांत या प्रथेचे गुन्हेगारीकरण होऊ शकते. याच्या विरोधात अमेरिकन एकजूट झाले आहेत. येत्या नोव्हेंबरमध्ये रिपब्लिकन पक्षासाठी काँग्रेसमध्ये मोठ्या बहुमताच्या अपेक्षा जागृत झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेनुसार, ७० टक्के अमेरिकन रो विरुद्ध वेड प्रकरणातील निर्णय फिरवण्याच्या विरोधात आहेत. याचा फायदा रिपब्लिकनकडे मतदारांचा कल वाढण्याच्या रूपात होईल.

बातम्या आणखी आहेत...