आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त राष्ट्राचा अहवाल:चीनमध्ये मुस्लिम महिलांवर अत्याचार, पुरुषांची नसबंदी, गुलामासारखी वागणूक

जीनिव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चीनमध्ये मानवी हक्कांची पायमल्ली केली जात आहे. तेथील शिनजियांग प्रांतात उइगर समुदायाला अमानुष वागणूक दिली जात आहे. संयुक्त राष्ट्राच्या अहवालातून हा दावा करण्यात आला आहे. अहवालानुसार शिनजियांगमध्ये उइगर व इतर मुस्लिम समुदायांना २०१७ ते २०१९ पर्यंत त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले हाेते. त्यांना आेलीस ठेवून यातना दिल्या जात आहेत. दहशतवाद, नक्षलवादाच्या नावाआडून चीन मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. मुस्लिम महिलांवर अत्याचार केले जात आहेत. पुरुषांची बळजबरी नसबंदी केली जात आहे. चीनमधील अत्याचार मानवतेच्या विराेधात आहेत, असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

१० लाख उइगर छावण्यांमध्ये कैद ४५ पानांच्या अहवालात उइगर मुस्लिम माेठ्या संख्येने बेपत्ता असल्याचे नमूद केले आहे. चीन सुरक्षाविषयक कायद्याचा मनमानी पद्धतीने वापर करून अल्पसंख्याकांचे दमन करत आहे. उइगरच्या बंदी छावण्यांत १० लाख लाेक कैद आहेत. चीनच्या व्हाेकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग सेंटर व मानसाेपचार रुग्णालयांत हाेणाऱ्या उपचारांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तेथे महिलांवर अत्याचार केले जात आहेत.

चीनचा हा नरसंहार; अनेक देशांचा आराेप शिनजियांगमध्ये उइगर मुस्लिमांवरील चिनी अत्याचाराला अनेक देशांनी नरसंहार असे संबाेधले. चीनने हे दावे फेटाळून लावले आहेत. या छावण्या दहशतवादाविराेधात लढण्याचे साधन असल्याचे चीनचे म्हणणे आहे.

चीनच्या दहशतवादविराेधी माॅडेलवर प्रश्नचिन्ह संयुक्त राष्ट्राने चीनच्या दहशतवादविराेधी माॅडेलवर प्रश्नचिन्ह लावले आहे. चीनचे कायदे मानवी हक्काच्या मार्गातील अडथळे आहेत. हे तपासण्यासाठी विविध कागदपत्रे, स्राेत व संशाेधनांचे विश्लेषण करण्यात आले.

चुकीचा अहवाल : चीन चीनविराेधी शक्तींनी चुकीची माहिती व खाेटेपणाने केलेला हा अहवाल आहे, अशा शब्दांत चीनने अहवाल फेटाळून लावला. ही बाब चीनला बदनाम करणारी व देशांतर्गत हस्तक्षेप करणारा प्रकार आहे. हा अहवाल चीनला बदनाम करण्यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप चीनने केला.

तैवानींचे उइगरांसारखे हाल शक्य : अमेरिका जगभरातील धार्मिक स्वातंत्र्यावर निगराणी करणाऱ्या अमेरिकेच्या एका संस्थेने इशारा दिला आहे. बीजिंगने लाेकशाही राष्ट्रावर हल्ला केल्यास तैवानच्या लाेकांचे हाल शिनजियांगमधील उइगरांसारखे हाेतील, असे त्यात म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...