आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेदभाव:चीनमध्ये महिलांवर अत्याचार, दर 7 सेकंदाला कौटुंबिक हिंसाचार

चीनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महिला हक्क, समानता व न्यायाबद्दल चीन करत असलेले दावे सपशेल खोटे असल्याची पोलखोल झाली आहे. चायना विमेन फेडरेशनच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली. त्यानुसार दर सात सेकंदाला महिलांना कौटुंबिक हिंसाचाराला तोंड द्यावे लागते. अशा प्रकरणांवरील शिक्षेचे प्रमाण केवळ ११ टक्के दिसून आले आहे. हाँगकाँग विद्यापीठातील प्रो. किंग वा फू के यांच्या म्हणण्यानुसार चीनमधील महिला अत्याचाराचे प्रकरण सोशल मीडियावर सेन्सर केले जाते. प्रो. किंग म्हणाले, चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने त्यासाठी विशेष विंग तयार केली आहे. गेल्या दोन वर्षांत मी-टूचे सुमारे ४०० चर्चित प्रकरणे सेन्सर करण्यात आली. चीनची सोशल नेटवर्किंग साइट विबोवर आयपी अॅड्रेसच्या साह्याने सरकारविरोधी आवाज दडपून टाकण्यात आला आहे.

महिलांनी घरकामे करावीत; जिनपिंग यांचा सल्ला चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी अलीकडेच महिलांना एक सल्ला दिला होता. महिलांनी घरगुती कामे करावीत. त्यांनी पारंपरिक भूमिका निभवावी. कमी होणारी लोकसंख्येची समस्या सोडवण्यासाठी महिलांना जास्त मुले जन्माला घालावीत. चीनचे सरकार महिलांना समानतेचा दर्जा देते, असा जिनपिंग यांचा दावा आहे.

सोशल मीडियावरील १००० अकाउंट बंद राष्ट्रपती पुढील महिन्यात मतदारसंघाच्या दौऱ्यावर जातील. जिनपिंग यांनी महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे दडपण्याचे आदेश दिले आहेत. त्याचाच भाग म्हणून सोशल मीडियावरील सुमारे एक हजाराहून जास्त अकाउंट बंद केले गेले. सुमारे ५० हजारांहून जास्त अकाउंटवर सरकारविरोधी कमेंट्सही हटवण्यात आल्या.

सर्व प्रकरणे बनावट; सरकारी टीव्हीचा कांगावा चीनचा सरकारी टीव्ही सीसीटीव्हीवर नेहमीच महिलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांना बनावट असे संबोधले जाते. शिनचियांगमध्ये अलीकडेच एका महिलेच्या शोषणाच्या घटनेवर पोलिसांनी २८ जणांना अटक केली. परंतु टीव्हीवर त्यास सामान्य मारहाणीची घटना असल्याचा दावा केला.

{महिला कार्यकर्त्या जियाझुआन यांच्यावरील अत्याचारातील आरोपी टीव्ही अँकर जियानझीची न्यायालयाने सुटका केली. कार्यकर्तीच्या बाजूने मी-टू चे आंदोलन झाले. {चीनच्या प्रसिद्ध टेनिसपटू पेंग शुई यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. परंतु नंतर त्या अचानक बेपत्ता झाल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...