आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यावरण:एसी - फ्रिजचा गॅस नष्ट करण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी भंगार व्यावसायिक झाला ‘चिल हंटर’

ग्वाटेमाला सिटीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्वाटेमालाच्या एंजलने व्यवसायालाच बनवले आपल्या उद्दिष्टाचे साधन

ग्वाटेमालाची राजधानी ग्वाटेमाला सिटीत भंगाराचा व्यवसाय करणारे एंजल टोलेडो यांनी जगाला प्रदूषणमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. विशेष म्हणजे एंजल यांनी यासाठी त्यांच्या व्यवसायालाच माध्यम केले आहे. यामुळे त्यांच्या मूळ कामावरही परिणाम होत नाही व हेतूही साध्य होतो. एंजल सांगतात, शहराबाहेरच्या भागात मी धातू, प्लास्टिक व काचेची रिसायकलिंग कंपनी चालवायचो. काम करताना मला माहिती मिळाली की, फ्रिज, एसीसारख्या उपकरणात रेफ्रिजरेंट गॅस असतो. तो व्यवस्थित नष्ट न केल्यास पर्यावरणात उष्णता वाढवतो. म्हणून तीन वर्षांपूर्वी मी रेफ्रिजरेंट गॅस नष्ट करण्याची मोहीम सुरू केली. एंजल सांगतात, मी मागील १६ वर्षांपासून भंगाराचा व्यवसाय करत आहे, मात्र रेफ्रिजरेंटचा कचरा नष्ट करण्याचा विचार तीन वर्षांपूर्वी सुचला याचा खेद आहे. हे आधीच लक्षात आले असते तर आतापर्यंत खूप काही करता आले असते.

एंजल यांना त्यांच्या मोहिमेत मदत करतेय टेडवॉटर्स नावाची कंपनी. या कंपनीची पथके जगभरात शासकीय, खासगी कंपन्या आणि लोकांसोबत पर्यावरणाची हानी करणारे गॅस शोधणे, त्यांना सुरक्षित ठेवणे, सुरक्षित पद्धतीने नष्ट करण्याच्या पद्धती शोधत आहेत. रेफ्रिजरेंट गॅसवर काम करत असल्याने त्यांचे सहकारी त्यांना ‘चिल हंटर्स’ देखील म्हणतात.

रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनरसारख्या उपकरणांत क्लोरो-फ्लोरो कार्बनचा (सीएफसी) वापर होतो. ओझोन आवरणाचे हाच वायू सर्वाधिक नुकसान करतो. सीएफसीतून निघणारा क्लोरिन गॅस ओझोनच्या तीन ऑक्सिजन अणूंपैकी एकाद्वारे प्रतिक्रिया देतो. ही प्रक्रिया सुरू असते आणि क्लोरिनचा एक अणू ओझोनचे १० लाख अणू नष्ट करतो. यामुळे ओझोनचे आवरण सतत पातळ होत असते.

बातम्या आणखी आहेत...