आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रायलमध्ये सत्तांतर:संसद विसर्जित करण्याच्या कवायतींना वेग, निवडणूक ऑक्टोबरमध्ये शक्य

तेल अविवएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

इस्रायलमधील पंतप्रधान नफ्ताली बेनेट सरकारच्या आघाडीत बिघाडी झाली आहे. सत्ता सोडणारे सरकार या आठवड्यात संसद विसर्जित करण्याचा प्रस्ताव मांडू शकते. एका कॅबिनेट मंत्र्यांनी त्यास दुजोरा दिला आहे. संसद विसर्जित झाल्यास देशात तीन वर्षांत पाचव्यांदा संसदीय निवडणूक होईल. बेनेट यांनी सरकारचे एक वर्ष नेतृत्व केले. परंतु आता आठ भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत आघाडीत राहू शकत नाही, अशी घोषणा त्यांनी सोमवारी केली होती. त्यांचे सहकारी परराष्ट्र मंत्री यायर लापिद निवडणुकीनंतर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कारभार पाहतील.नवीन निवडणूक ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. लापिड यांची येश एटिड पक्षाचे सदस्य व कल्याणमंत्री मीर कोहेन म्हणाले, आघाडी बुधवारी प्रारंभिक मतदानासाठी विधेयक मांडणार आहे.

बेनेट सरकारच्या बाजूने विरोधी पक्षापेक्षा केवळ एक मत जास्त :बेनेट सरकार आधीच अल्पमतात होते. त्यांच्याकडे विरोधकांच्या तुलनेत केवळ एक मत जास्त होते. सरकारच्या बाजूने ६० तर विरोधी बाजूने ५९ खासदारांनी मतदान केले होते. इस्रायलमध्ये दोन वर्षांत चार सरकारे अल्पमतात होती. त्यामुळे निवडणूक लादली गेली.

मित्र पक्षांची नाराजी : आघाडीत सहभागी युनायटेड अरब पॅलेस्टाइन प्रकरणात बेनेट सरकारवर नाराज आहे. पॅलेस्टाइन वस्तीवरून पूर्वीच नाराजी व्यक्त झाली होती. बेनेट सरकार पॅलेस्टाइन वस्तीत ज्यूंना स्थान देत आहे. अरब वंशीय लाेकांवरील हा अन्याय ठरतो.