आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • The Acceptance । Then The Right To Choose Death In Discussion The Acceptance Of Euthanasia Increased In Western Countries, 'good Death' Is Now An Event There; Doctor Helping Death Between Beach Party

दिव्य मराठी विशेष:पाश्चात्त्य देशांत इच्छामरणाची स्वीकृती वाढली, ‘चांगल्या मृत्यूचे’ही सोहळे; सागरी किनारे, पार्ट्यांत मृत्यूसाठी होईल डॉक्टरांची मदत

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ब्रिटनमध्ये इच्छामृत्यूवरील कायद्याला सहमती, मृत्यू निवडण्याचा हक्क पुन्हा चर्चेत

वॉशिंग्टन | बहुतांश पाश्चिमात्य देशांत मदत घेऊन मृत्यूच्या (मेडिकल असिस्टेड डेथ) बाजूने जनमत वाढत आहे. २००२ ला स्पेनमध्ये ६०% लाेकांनी इच्छामृत्यूचे समर्थन केले होते. २०१९ मध्ये याच्या समर्थनासाठी ७१% लोक पुढे आले. ब्रिटनच्या मानववंशशास्त्रज्ञ नाओमी रिचर्ड्स म्हणाले की, मृत्यू मदतीने मृत्यू आणि मरणाची संस्कृती बदलून टाकली.

लोक आता मृत्यूविषयी अधिक बोलताहेत. इन्स्टाग्रामच्या युगात ‘चांगल्या मृत्यू’ची कल्पना शक्य आहे. एवढेच नव्हे, ‘चांगला मृत्यू’ आता इव्हेंट आहे. त्याचे नियोजन केले जाते. कॅनडाच्या डॉ. एलेन वेइब म्हणाल्या, ‘त्या लोकांना समुद्र किनारा, जंगल किंवा पार्टीत मरण्यासाठी मदत करतात. कोरोनाकाळात रुग्णालयात जेव्हा लोक एकट्याने जीव सोडतात, अशा वेळी असा मृत्यू योग्य वाटतो.’

वास्तविक ३० वर्षांपूर्वी स्वित्झर्लंड वगळता जगात सर्वच ठिकाणी इच्छामृत्यूवर बंदी होती. १९९७ मध्ये अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये सन्मानाने मृत्यूचा कायदा बनला. यात दोन डॉक्टरांना निश्चित करायचे होते की, रुग्ण इच्छामृत्यू निवडण्याच्या स्थितीत, त्याचे आयुष्य सहा महिन्यांचेच दिसत आहे. सुमारे दोन हजार लोकांनी या कायद्यांतर्गत मृत्यू निवडला.

यात कोणतेही संशयास्पद प्रकरण आढळून आलेले नाही. आता हा कायदा दहा राज्यांत आहे. ओरेगॉनच्या धर्तीवर एक कायदा ९ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियात अस्तित्वात आला. ब्रिटनमध्येही ऑक्टोबरमध्ये हाऊस ऑर्फ लॉर्ड्सने असा कायदा पारित केला. आता त्याला हाऊस ऑफ कॉमन्सच्या मंजुरीची गरज आहे.

पूर्ण जीवन जगणाऱ्यांनाही पर्याय देण्याची शिफारस

नेदरलँडमध्ये उदारमतवादी डी ६६ पक्ष आता आपण आयुष्य जगून झालेे, असा विचार करणाऱ्या लोकांचा या कायद्यात समावेश करू पाहत आहे. या पक्षाने असा कायदाच बनवण्याचा प्रस्ताव मांडला. यात ७५ वर्षांवरील लोकांना मृत्यूसाठी गोळ्या देण्याचा प्रस्ताव आहे. इंटरनेटवरही बेबी बूमर्सचे (दुसऱ्या महायुद्धानंतर जन्मदराच्या उसळीनंतर जन्मलेले लोक) नेटवर्क मृत्यूच्या पद्धतीविषयी माहिती देत आहे.

डझनभर देशांत वैध, डॉक्टरांवर याचा गैरवापर केल्याचा आरोप
पश्चिमेकडील डझनभर देशांत इच्छामृत्यू गुन्ह्याच्या चाकोरीतून बाहेर आहे. अनेक देशांत कायदा बनवण्याचा किंवा त्यावर विचार सुरू आहे. ५ नोव्हेंबरला पोर्तुगीज संसदेने असाध्य आणि अपरिवर्तनीय आजाराच्या स्थितीत इच्छामृत्यूची परवानगी देण्याच्या विधेयकाला मंजुरी दिली आहे. चिली, आयर्लंड, इटली आणि उरुग्वेसारखे कॅथॉलिक देशही मृत्यू निवडण्याच्या अधिकाराच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. बेल्जियम, काेलंबिया, नेदरलँड सरकारांनी यात मरणासन्न मुलांचाही समावेश केला आहे. तथापि, याचा विरोधही होत आहे.

बातम्या आणखी आहेत...