आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • According To A Survey By The Canadian Men's Health Foundation, 60% Of Fathers In Children Have An Emotional Bond With Their Children

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:कॅनडियन मेन्स हेल्थ फाउंडेशनचा सर्व्हे, लॉकडाऊनमध्ये 60% वडिलांची मुलांशी झाली भावनिक नाळ घट्ट!

टोरँटो10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनचा वडील-मुलांच्या नात्यावर चांगला परिणाम झाल्याचे दिसून येते. त्यांच्यातील भावनिक नाळ आणखी घट्ट झाली आहे. कॅनडात झालेल्या पाहणीत ६० टक्के लाेकांनी ही बाब मान्य केली. कॅनडियन मेन्स हेल्थ फाउंडेशनने एक हजाराहून जास्त पित्यांशी चर्चेवर आधारित पाहणी केली. त्यात हे तथ्य स्पष्ट झाले. ५२ टक्के पिता म्हणाले, वडील म्हणून असलेल्या जबाबदारीची जाणीव मला याच काळात झाली. लॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतरही मुलांना जास्तीत जास्त वेळ देणार आहे, अशी ५० टक्के वडिलांची भावना आहे. लॉकडाऊनचा काळ मुलांसोबत व्यतीत केल्याचे ६६ टक्के उत्तरदात्यांनी सांगितले. या काळात मुलांना पूर्वीपेक्षा जास्त मार्गदर्शन केले, असे ५६ टक्के लोकांनी सांगितले. कॅनडाचे आरोग्यमंत्री अँड्रियन डिक्स म्हणाले, कोरोनामुळे कुटुंब तणावाखाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकजूट दाखवून आव्हानांचा मुकाबला केला आहे. कॅनडात बहुतांश पालक पूर्णवेळ नोकरी करतात. त्यामुळे त्यांना मुलांसाठी वेळ देणे कठीण होत होते. आज मात्र मुलांसोबत किड्स गेमचा आनंद घेताना ही पालक मंडळी दिसू लागली आहे.

मुलींना पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण
बर्नबी येथील रहिवासी व व्यावसायिक शेफ डॅल व्हॉटसन म्हणाले, मार्चमध्ये माझे काम बंद पडले होते. सुरुवातीला तणावात होता. आता मुलींसोबत किचनमध्ये जास्त वेळ घालवतो. मुलींना छान-छान पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण देतो. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवल्याने तणाव नाही. या सगळ्या गोष्टी लॉकडाऊनपूर्वी होत नव्हत्या. महामारीतूनही नवे मार्ग खुले होतील याचा कोणी विचारही केला नसेल. इंट्स कन्सल्टिंगचे व्यवस्थापकीय पार्टनर निक ब्लॅक म्हणाले, लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या खाण्यावर जास्त भर दिला. कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहिले.

कॅनडात बहुतांश पालक पूर्णवेळ नोकरी करतात. त्यामुळे त्यांना मुलांसाठी वेळ देणे कठीण होत होते. आज मात्र मुलांसोबत किड्स गेमचा आनंद घेताना ही पालक मंडळी दिसू लागली आहे.

बातम्या आणखी आहेत...