आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार प्रकरणासह ७ अन्य प्रकरणांतही न्यायालयाने दिलासा दिला आहे. यादरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी इम्रान यांच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. हिंसाचारातील दोषी, कारस्थान रचणारे, हल्लेखोरांची ओळख पटवून सर्वांना ७२ तासांत अटक करण्याचे आदेश शाहबाज यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
त्यांनी शनिवारी लाहोरमध्ये सांगितले की, कोअर कमांडर हाऊसचे जळालेले छायाचित्र हृदय हेलावून टाकणारे आहे. जे काम बाहेरचे शत्रू दशकांपासून करू शकले नाहीत, ते इम्रान नियाजी आणि त्यांच्या जमावाने केले. इम्रान आणि त्यांचा जमाव कुण्या अतिरेकी किंवा राज्यविरोधी गटापेक्षा कमी नाही.
३६० ठिकाणी हिंसाचार पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्ला म्हणाले,की ९ मे रोजी राजधानी इस्लामाबादमध्ये १२ ठिकाणी आंदोलन-हिंसाचार झाला. यात ६५० ते ७०० लोक सहभागी होते. पंजाबमध्ये २२१ ठिकाणी हिंसाचार झाला. यामध्ये १८ हजारांच्या आसपास लोक सहभागी होते. खैबर पख्तुनख्वामध्ये १२६ ठिकाणी दंगेखोरांनी हिंसाचार केला. या घटनांत २२ हजार लोक होते. १० मे रोजी इस्लामाबादमधील आंदोलनात १९०० लोक, पंजाबमध्ये २२०० लोक व खैबरमध्ये १३ हजार लोक होते.
पीटीआयचे अध्यक्ष इम्रान यांनी शनिवारी व्हिडिओद्वारे समर्थकांना संबोधित केले. इम्रान यांनी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली हिंसाचाराची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली. पीटीआयला अतिरेकी संघटना ठरवण्यासाठी सत्ताधारी पक्ष व लष्कराने हिंसाचार केल्याचा आरोप त्यांनी केला. इम्रान म्हणाले, ज्यांना निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे, त्यांना देशात अराजक पसरावी असे वाटते. इम्रान यांनी डीजीआयएसपीआरवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, तुम्ही म्हणालात मी पाखंडी आहे आणि जेवढे मी लष्कराला नुकसान पोहोचवले तेवढे कुणीच केले नाही. जीडीआयएसपीआर साहेब जेव्हा लष्करप्रमुखांनी मला धोका देऊन पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या गुन्हेगारांकडे सत्ता सोपवली..तुम्ही राजकारणात या आणि पक्ष स्थापन करा.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.