आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियात व्हिक्ट्री डे परेड:आमच्यावर हल्ल्याची तयारी होती म्हणून युक्रेनवर कारवाई : पुतीन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युक्रेनवर हल्ले सुरू असतानाच रशियात सोमवारी ७७ वा विजयी दिन साजरा करण्यात आला. राजधानी मॉस्केतील लाल चौकात आयोजित परेडमध्ये लेनिन यांच्या समाधिस्थळापासून राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवरील सैन्य कारवाई योग्य असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, ‘पाश्चिमात्य देश क्रिमियासह रशियावर हल्ला करण्याची तयारी करत होते. त्यामुळे युक्रेनवर हल्ला करणे गरजेचे होते. नाटो देश आमच्या सीमेवर धोका निर्माण करू पाहत होते. रशियन सेना युक्रेनमध्ये आपल्या मातृभूमीचे रक्षण करत आहे.’

पुतीन यांनी दावा केला की, ज्याप्रमाणे दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी सेनेविरुद्ध आम्ही विजयी झालो तसेच युक्रेनविरुद्धच्या युद्धातही आम्ही विजयी होऊ. तथापि, पुतीन यांनी अपेक्षांच्या विपरीत अशी कोणतीही घोषणा केली नाही. ९ मे रोजी दुसऱ्या महायुद्धात नाझी जर्मनीवर संयुक्त रशियाला विजय मिळाला होता. यानिमित्ताने दरवर्षी ९ मे रोजी विजयी दिवस साजरा केला जातो. पहिली विजयी दिवस परेड २४ जून १९४५ रोजी आयोजित करण्यात आली होती. रशियन सैनिकांनी केवळ नाझींसाठी मॉस्कोकरिता लढाई लढली नव्हती, तर लेनिनवाद आणि स्टॅलिनग्राडचे संरक्षणही केले होते.

बातम्या आणखी आहेत...