आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीलंकेतील जनक्षाेभासारखी परिस्थिती इराकमध्येही दिसू लागली आहे. शिया धर्मगुरू मुक्तादा अल-सद्र यांचे समर्थक सुरक्षा व्यवस्थेला न जुमानता बगदादमधील सर्वात सुरक्षित ग्रीन झाेनची भिंत पार करून संसदेच्या वास्तूमध्ये घुसले. या जमावाने संसदेची इमारत ताब्यात घेतली आहे. गेल्या वर्षी ऑक्टाेबरमध्ये झालेल्या निवडणुकीच्या सुमारे २९० दिवसांपासून देश काळजीवाहू पंतप्रधानांच्या भरवशावर वाटचाल करत आहे. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत अल-सद्र गटाने सर्वाधिक जागा जिंकल्या हाेत्या. परंतु इतर पक्षांसाेबतची चर्चा स्थगित झाली हाेती. कारण कुर्द व शिया खासदारांत वाटाघाटीबाबत सहमती हाेऊ शकली नव्हती. अल-सद्र व त्यांचे समर्थक शिया आहेत. मात्र इराणसाेबत सलाेखा ठेवण्याची भूमिका मांडणाऱ्या इतर गटांसाेबत त्यांची सहमती नाही. माेहंमद अल सुदानी यांच्या फ्रेमवर्क पार्टीला त्यांचा विराेध आहे. नवीन राष्ट्रपती निवडणूक घेण्यासाठी पुरेसे समर्थन करण्यात अल-सद्र यांना अपयश आले हाेते. त्यानंतर त्यांनी आपल्या खासदारांना सामूहिक रूपाने राजीनामे देण्याचे आदेश दिले हाेते.
6 वर्षांत दुसऱ्यांदा संसद लक्ष्य
२०१६ मध्ये अल-सद्रच्या समर्थकांनी तत्कालीन पंतप्रधान हैदर अल-सब्दी यांच्याकडे राजकीय सुधारणेसाठी संसदेवर हल्ला केला हाेता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.