आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Actor Dev Patel Saves Lift Of Citizen । Australia | Slumdog Millionaire Actor Risked His Own Life While Preventing A Stabbing Attack

रिअल हीरो ठरला अभिनेता देव पटेल:चाकूहल्ला रोखताना स्वत:चा जीव धोक्यात घातला, पोलिस येईपर्यंत केले जखमीचे रक्षण

कॅनबेरा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वंशाचा अभिनेता देव पटेल याने आपला जीव धोक्यात घालून एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवला. 'लाइफ ऑफ पाय' आणि 'स्लम डॉग मिलेनियर' या चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेल्या देवने एका व्यक्तीवरील चाकूहल्ला रोखण्यासाठी स्वत: धाव घेतली. जखमी व्यक्तीच्या संरक्षणासाठी पोलिस येईपर्यंत तो तिथेच उभा राहिला.

देव हा ऑस्ट्रेलियातील अ‍ॅडिलेडचा रहिवासी आहे आणि तिथेही ही घटना घडली आहे. मंगळवारी देव त्याच्या मित्रांसह अ‍ॅडिलेडमधील एका जनरल स्टोअरमध्ये गेला होता. दुकानाजवळ एक जोडपे भांडत होते. भांडत असताना हे जोडपे दुकानाच्या अगदी जवळ आले. यादरम्यान महिलेने त्या व्यक्तीच्या छातीवर वार केले.

अ‍ॅडिलेडमधील गौगर स्ट्रीटवर चाकूहल्ला करताना देव पटेल हजर होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून घटनेची माहिती घेतली.
अ‍ॅडिलेडमधील गौगर स्ट्रीटवर चाकूहल्ला करताना देव पटेल हजर होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडून घटनेची माहिती घेतली.

चाकूने वार केल्याप्रकरणी महिलेला अटक, पुरुषाची प्रकृती चिंताजनक नाही

हे प्रकरण चिघळण्याआधीच देव आणि त्याचे मित्र यांनी तेथे धाव घेतली. पोलीस आणि रुग्णवाहिका येईपर्यंत जखमी व्यक्तीला सुरक्षित ठेवण्यात आले. देवच्या प्रवक्त्याने सांगितले की, अभिनेता देवने त्याच्या नॅचरल इन्स्टिंक्टनुसारच वर्तन केले.

मला वाटते की, तिथे जे कोणी आहेत ते ठीक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 32 वर्षीय जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती ठीक आहे. महिलेला अटक करण्यात आली आहे.

चाहत्यांनी केले देवचे कौतुक

सोशल मीडियावर चाहते देव पटेलचे कौतुक करत आहेत. एखाद्या धोकादायक परिस्थितीतही एखाद्याचा जीव वाचवणे हे कौतुकास्पद आहे, असे चाहत्यांनी म्हटले. एका यूजरने म्हटले - अनोळखी व्यक्तीसाठी तुमचा जीव धोक्यात घालत आहे. That's My Boy...

या घटनेनंतर अ‍ॅडिलेडचे स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.
या घटनेनंतर अ‍ॅडिलेडचे स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला.

वयाच्या 18व्या वर्षी मिळाला स्लम डॉग मिलेनिअर

2008 मध्ये डॅनी बॉयलच्या स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटाने देव पटेल जगप्रसिद्ध झाला. या चित्रपटाने 8 ऑस्कर पुरस्कार जिंकले. देव याच्याशिवाय या चित्रपटात फ्रीडा पिंटो, अनिल कपूर हेदेखील होते. देव पटेलला 2016च्या लायन चित्रपटासाठीही ऑस्करमध्ये नामांकन मिळाले होते.

या चित्रपटात त्याने एका भारतीय मुलाची भूमिका साकारली होती, ज्याला एका ऑस्ट्रेलियन कुटुंबाने दत्तक घेतले होते. याशिवाय लाइफ ऑफ पाय आणि लास्ट एअरबेंडर यासारख्या चित्रपटांनी देवला जगात आणि भारतातही लोकप्रिय केले.

बातम्या आणखी आहेत...