आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Admission To A Good College Or A Job Does Not Make Children Happy, Experts Say Teach The Art Of Being Happy In Whatever It Is

दिव्य मराठी विशेष:चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश किंवा नोकरीमुळे मुलांना आनंद मिळत नाही, तज्ज्ञ म्हणाले- जे आहे त्यातही आनंदी राहण्याची कला शिकवा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तज्ज्ञांनी विश्लेषणाच्या आधारावर सांगितली जीवनात खरा आनंद मिळवण्याची चार सूत्रे

तुम्ही मुलांबाबत काय विचार करता, असा आईवडिलांना प्रश्न केल्यास त्यांचे उत्तर असते त्यांचा आनंद! मुलांना विचारा की आईवडील काय विचार करतात, तर ते सांगतात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश. बहुतांश आईवडिलांच्या मते चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्यास मुलांना चांगली नोकरी मिळते व त्यांच्या जीवनात आनंद दरवळतो. परंतु तज्ज्ञ केवळ यशस्वी करिअरला आनंद मानत नाहीत. आनंदाची आणखी काही कारणे त्यांच्याकडूनच जाणून घ्या..

1. मुलांशी नात्यांच्या महत्त्वावर मोकळेपणाने बोला
आईवडील नेहमीच मुलांसोबत करिअर आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्याबाबत बोलतात. समुपदेशन तज्ज्ञ कॅथलीन ओकॉनर म्हणाल्या, ज्या नात्यांमुळे तुम्हाला आनंद दिला त्यावर मुलांशी बोला. तुम्ही हे नाते जपण्यासाठी काय काय केले ते सांगा. तुम्हाला सर्वाधिक जवळचे कोण वाटते, असे मुलांना विचारा. ते या नात्यांना वेळ आणि ऊर्जा देऊ शकतात का, अशी विचारणा करा. यामुळे या नात्यांत ते आंनद शोधू लागतील.

2. धोकादायक गैरसमज तोडा, सत्याशी सामोरे जा
मुले नेहमीच आपल्या आईवडिलांचे ऐकून आनंदाचे मोजमाप करतात. ग्रेड्स मिळवण्यावर भर देतात. चांगले कॉलेजच एकमेव लक्ष्य असते. या गोष्टी ते आपले मित्र, शिक्षक आणि वातावरणाशी जोडून पाहतात. यामुळे केवळ प्रतिस्पर्धा आणि वस्तुनिष्ठतेला चालना मिळते. तज्ज्ञ म्हणतात की, हे धोकादायक गैरसमज मोडीत काढा. मुलांना खरे सांगा की, या भौतिक सुखांमुळे आनंद मिळत नाही.

3. जीवन अर्थपूर्ण कसे बनवावे हे शिकवा
९० च्या दशकापासून सकारात्मकतेच्या मानसशास्त्रावर काम करणारे मार्टिन सॅलिगमेन जीवनाचा ‘उद्देश’ आणि ‘अर्थ’ यालाच आनंदाचा आधार मानतात. ते म्हणतात, मुलांना केवळ पैसे कमावल्यानेच आनंद मिळत नाही. आनंदी राहण्यासाठी अन्य मार्गही आहेत. काही मुलांना पर्यावरणाची देखभाल केल्यानेही आनंद मिळतो. काहींना धार्मिक स्थळी जाऊन तर काहींना समाज व ज्येष्ठांच्या मदतीत आनंद मिळतो.

4.किशोरावस्था केवळ सहन करण्याचा काळ नव्हे
सर्वच शोध सांगतात की ‘वस्तूं’पेक्षा जास्त ‘वेळे’ला महत्त्व देणे, काही ‘मिळवण्या’पेक्षा काही ‘देणे’ आणि जे आहे त्यात समाधानी राहणे शिकलो तर आनंद मिळतो. चांगल्या शाळा किंवा कॉलेजात प्रवेश मिळाला नाही म्हणून मुलगा निराश असेल तर आईवडील अस्वस्थ होत नाहीत. वास्तविक भविष्यातील सुखासाठी असे झाले असावे, असा ते विचार करतात. पण किशोरावस्था केवळ सहन करण्याचा काळ ठरू देऊ नका.

बातम्या आणखी आहेत...