आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रजाक यांची पत्नी रोशमा मन्सूर यांच्या वकिलाने पोलिसांवर मॅडमची महागडे पर्स, हँडबॅगची काळजी घेतली नसल्याचे, त्यांना खराब करण्याचे आणि नुकसान केल्याचे आरोप केले आहेत. एवढेच नव्हे तर त्यांनी सरकारकडून भरपाईची मागणी केली आहे. रजाकवर पदाचा गैरवापर, भ्रष्टाचार आणि मनी लाँडरिंगद्वारे सुमारे ५००० कोटींचा अपहार केल्याचा आराेप आहे. बुधवारी क्वालालंपूर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
नजीबचे वकील मोहंमद शफी अब्दुल्ला यांनी बचावासाठी मलेशियाच्या केंद्रीय बँकेत ठेवलेले जप्त साहित्य बघण्याची परवानगी मागितली होती. या नंतर त्यांनी उच्च न्यायालयात सांगितले की, पोलिसांनी मॅडमच्या महागड्या साहित्याची थोडीही काळजी घेतली नाही. ते खराब केले. पोलिसांनी पक्क्या मार्करने त्यावर क्रमांक टाकले. अधिकाऱ्यांनी या अमूल्य वस्तू सांभाळण्याबाबत हलगर्जी केली, लाखो डॉलरचे नुकसान होऊ शकते. त्याची जबाबदारी सरकारची आहे, यामुळे सरकारला भरपाई देण्याचे आणि वस्तू बदलण्यासाठी सांगण्यात यावे. न्यायालयाने यावर कोणताही निर्णय दिला नाही. मात्र, नजीब यांचे निकटवर्तीय आणि यूएमएनओ नेते मुसा अमनला आरोपातून मुक्त केले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.