आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणिस्तान:मुलांच्या माध्यमिक शाळेला सुरुवात, पण 36 लाखांवर मुलींना प्रवेशबंदी

काबूलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलींना शिक्षण देण्याच्या केवळ घोषणा, तालिबानचा पर्दाफाश

अफगाणिस्तानात तालिबानची दुटप्पी भूमिका उघड झाली आहे. मुलींना महिला शिक्षिका शिकवतील, असे तालिबानने म्हटले हाेते. परंतु शनिवारी माध्यमिक शाळा सुरू हाेऊन देखील ३६ लाख मुलींना प्रवेशापासून वंचित ठेवण्यात आले. मुलांसाठी शाळा सुरू झाली. शिक्षण मंत्रालयाने मुलींच्या शिक्षणाबाबत काहीही स्पष्टीकरण दिले नाही. वीस वर्षांपूर्वी मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आले हाेते. मात्र या वेळी सरकार असे करणार नाही. तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तानातील मुलींच्या शाळेतील दस्तएेवज संचालकांनी दहन करून टाकले हाेते. आता अफगाणिस्तानात मुलींच्या शिक्षणाबाबतचा सर्व तपशील केवळ युनिसेफकडे उपलब्ध आहे. तालिबानने मागील सरकारमधील महिलांसाठी तयार केलेले मंत्रालय रद्दबातल केले आहे. महिलांशी संबंधित शरिया आधारित मंत्रालय त्याची जागा घेणार आहे. तालिबानच्या आधीच्या राजवटीत याच कुख्यात मंत्रालयामुळे महिलांवर प्रचंड अत्याचार झाले हाेते.

सुमारे एक लाखाची लाेकसंख्या असलेल्या पंजशीर खाेऱ्यातून काबूलला आलेला व्यक्ती म्हणाली, तालिबानने विविध प्रवेशद्वारांवर शिपिंग कंटेनर लावले आहेत. त्यात बसून तालिबान दहशतवादी ये-जा करणाऱ्या लाेकांची नाेंद घेत आहेत. तुंबळ युद्ध सुरू आहे. काही तासांत चित्र पालटू शकते, असे या व्यक्तीने सांगितले.

मोठा आंतरराष्ट्रीय निधी
आशिया फाउंडेशच्या पाहणीनुसार अफगाणमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी दरवर्षी अब्जावधी डाॅलरचे बजेट मिळते. अफगाणिस्तानात मुलींना भयमुक्त शिक्षणाची हमी मिळायला हवी. ताेपर्यंत निधी मिळणार नाही, असे संयुक्त राष्ट्र ग्लाेबल एज्युकेशनचे विशेष प्रतिनिधी ब्राऊन यांनी सांगितले.

गावात काय स्थिती आहे?
सेंटर फाॅर ग्लाेबल डेव्हलपमेंटनुसार शहरी क्षेत्रात ७० टक्के तर ग्रामीण भागात ४० टक्के एवढ्याच मुली शाळेत जातात. मुले-मुलींनी स्वतंत्र बसावे, असे तालिबानी फर्मान असल्याने ग्रामीण भागात लाेक मुलींना शाळेत पाठवायला घाबरू लागले आहेत. त्यामुळे मुली वंचित आहेत.

लाेकांमध्ये चिंता का?
मुलींना शरियानुसार केवळ धार्मिक शिक्षण दिले जाईल, अशी भीती लाेकांना वाटत आहे. मुलींना माध्यमिकपर्यंतचे शिक्षण द्यावे, असे तालिबानला वाटत नाही. तालिबानच्या आधीच्या राजवटीत केवळ १६ टक्के मुलींच्या शाळा हाेत्या. तेथे केवळ एक तृतीयांश शिक्षिका आहेत.

पंजशीर खोऱ्यात पंधरवड्यापासून संघर्ष
तालिबानच्या वर्चस्वानंतर अफगाणिस्तानचा अखेरचा किल्ला पंजशीर मात्र अजूनही अजेय आहे. पंजशीर खाेरे शांत आहे. दुकान-बाजारपेठ सर्वकाही बंद आहे. इंटरनेट व वीज पुरवठा खंडित झाला आहे. गावात लाेक दहशतीखाली आहेत. तरुण तसेच वयस्करांनी पलायन केले आहे. बहुतांश लाेक काबूलच्या दिशेने रवाना झाले आहेत. आता खाेऱ्यात वृद्ध तसेच पशुपालक राहिले आहेत. गावांचाही आपसातील संपर्क तुटला आहे. पंधरवड्यापासून सुरू असलेल्या संघर्षानंतरही तालिबानला पंजशीरवर अद्यापही विजय मिळवता आलेला नाही. कमांडर अहमद मसूदच्या नेतृत्वाखालील नाॅर्दर्न रिजेस्टेंस फ्रंटने अजूनही पराभव स्वीकारलेला नाही.

अशिक्षित अफगाण
३७ लाख मुले-मुली शालेय शिक्षणापासून दूर

साक्षरतेत माेठी दरी
३७ टक्के मुली, ६६ टक्के मुले

एक तृतीयांश मुलींचा विवाह १८ वर्षांच्या आधी
९ टक्के विवाह १५ वर्षांपूर्वी

जीवन म्हणजे केवळ िववाह?
शाळेत जाऊ शकत नसलेली एक मुलगी म्हणाली, मला वकील व्हायचे हाेते. दरराेज सकाळी उठून मी स्वत:ला एक प्रश्न विचारते. मी का जिवंत आहे? मी घरात राहावे. काेणीतरी घरी येईल आणि माझा त्याच्याशी विवाह हाेईल. मग जीवन म्हणजे केवळ िववाह करणे असते का?

बातम्या आणखी आहेत...