आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Afganistan Conflict Updates: There Is No Hindu Sikh In Jalalabad In Afghanistan Now; News And Live Updates

ग्राउंड रिपोर्ट:हिंदू-शीख सर्व सोडून गेले... मात्र नाते असे की ते परतेपर्यंत मुस्लिम सांभाळताहेत व्यवसाय; अफगाणिस्तानात जलालाबादेत आता एकही हिंदू- शीख नाही

जलालाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालिबानी गार्ड्सने रिफतउल्लाह यांना जलालाबादमध्ये वृत्तांकनापासून रोखले.

अफगाणिस्तानातील जलालाबाद शहरात तालिबानी क्रौर्याच्या भीषण काळात मानवी नात्यांच्या काही मार्मिक कथा रचल्या जात आहेत. काबूलवर तालिबानी नियंत्रणाच्या १४ ऑगस्टच्या रात्रीच्या आधीच येथील हिंदू व शीख कुटुंबासोबत दुसरीकडे निघून गेले. काही भारतात गेले. काही युरोपात तर काही काबूलच्या आसपास लपून वाईट काळ निघून जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या कुटुंबांची येथे ५० पेक्षा जास्त दुकाने आहेत. यातील काही अजूनही उघडी आहेत. त्यांना स्थानिक अफगाणी चालवत आहेत.

जलालाबाद शहराच्या मध्यभागी झोन-१ मध्ये शीख डॉक्टरचा दवाखाना मो. खालिद नावाचा अफगाणी सांभाळत आहे. खालिद सांगतात, मी दवाखान्याच्या मालकाला रोज स्थितीची माहिती देत असतो. स्थिती सुधारल्यावर ते परत येतील याचा आम्हाला विश्वास आहे. तोपर्यंत आम्ही त्यांचा व्यवसाय बंद होऊ देणार नाही. जवळच अमित सिंग यांचेही दुकान आहे. ते रफीउल्लाह चालवत आहेत. ते सांगतात, अमित भारतातून रोज फोन करतात. ते सध्या परतू शकत नाहीत. ते येईपर्यंत मलाच त्यांची जबाबदारी सांभाळायची आहे.

आम्ही अनेक वर्षांपासून सोबत आहोत, अशा काळात आम्ही नाही मदत करणार तर कोण करेल? जलालाबादेत सुमारे १०० शीख कुटुंबे होती. मुख्य बाजारात एक गुरुद्वारा आहे, त्यांच्या चारही बाजूला दुकाने आहेत. त्यातील बहुतांश औषधी विकणाऱ्या शिखांची आहेत. त्यांना ‘योनाई डॉक्टर्स’ म्हटले जाते. गुरुद्वाऱ्याचे सर्व दरवाजे आतून बंद होते. वाजवल्यावर आतून कोणीतरी म्हणाले, आता येथे अरदास होत नाही. येथे रोज दोन-तीन सशस्त्र तालिबानी गस्त घालतात. लोकांची चौकशी करतात.

जर मुस्लिमच देश सोडत आहेत तर हिंदू-शीख कसे थांबतील
एका स्थानिक पत्रकाराने सांगितले, तालिबानने अल्पसंख्याकांना सुरक्षेचे आश्वासन दिले असले तरी त्यांच्या बोलण्यावर कोणालाच विश्वास नाही. विश्वास बसावा म्हणून तालिबानी नेते काही प्रांतांत अल्पसंख्याकांच्या भेटी घेत आहेत. मात्र जर मुस्लिमांनाच देश सोडायचा आहे तर कोणत्याही अल्पसंख्याकांची येथे थांबण्याची इच्छा नसेल. काबूलजवळ एका गुरुद्वारात शिखांसोबत हिंदूंनीही आश्रय घेतला आहे. ते वेगवेगळ्या प्रांतांत आपले सर्वकाही सोडून येथे आले आहेत. वेगवेगळ्या देशांना आश्रय देण्याची विनंती करत आहेत. जलालाबादच्या दुसऱ्या एका पत्रकाराने सांगितले, आता येथे एखादा हिंदू असला तरी तो मुस्लिम अफगाणीसारखा राहत असेल.

बातम्या आणखी आहेत...