आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजरा कल्पना करा, तो किती बाप किती मजबूर असेल ज्याला आपल्या मुलीला कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी एका सावकाराकडे विकावे लागते. हे ऐकूणच काळजाचा धरकाप होतो. पण, आज अफगाणिस्तानात हेच सत्य आहे. ही कथा समोर आली आहे. पण, असंख्य वेदनादायक किस्सेही असतील जे तालिबानी आतंक आणि अट्टहासात कुठे न कुठे गुदरमरतच आपले प्राण सोडत असतील. येथे आपल्याला ती कहानी माहिती आहे, ज्यामध्ये एक पिता आपल्या चार वर्षांच्या मुलीला विकण्याचा करार करणार आहे.
कोण आहे तो दुर्दैवी बाप?
'टाइम्स ऑफ लंडन'ने आपल्या अहवालात या अफगाण वडिलांची असहायता उघड केली आहे. हा अहवाल 'न्यूयॉर्क पोस्ट'नेही प्रकाशित केला आहे. वडिलांचे नाव मीर नजीर आहे. 15 ऑगस्टपर्यंत नजीर हा अफगाण पोलिसात कर्मचारी होता. तालिबान्यांनी देश ताब्यात घेतला तेव्हा नोकरी गेली. जी बचत होती ती संपली होती. घर सुद्धा भाड्याने आहे. कुटुंबात एकूण सात लोक आहेत. आता त्यांचे पोट कसे भरायचे?
कोण घेणार कुटुंबाची जबाबदारी
मीरने लंडन टाइम्सच्या रिपोर्टर अँथनी लॉयडला सांगितले - सात लोकांचे कुटुंब आहे. सर्वात लहान मुलीचे नाव सफिया आहे. ती चार वर्षांची आहे. तालिबान आल्यावर माझी पोलिसांची नोकरी गेली. आता मी कुटुंबाला कसे पोसवू, मला अन्न कोठून मिळेल? देशाची अर्थव्यवस्थाही उद्ध्वस्त झाली आहे. कुठेही आशा नाही. माझी मुलगी विकण्यापेक्षा मी स्वतः मेल असतो तर बरे झाले असते. पण, माझ्या मृत्यूनंतरही कुटुंब वाचेल का? त्यांना भाकरी कोण देईल? हा एक असहाय निर्णय आहे.
कदाचित सफियाचे भाग्य बदलेल
आवंढा गिळण्याचा अयशस्वी प्रयत्न करताना, मीर पुढे म्हणतात - एक दुकानदार सापडला. त्याला वडील होण्याचा आनंद मिळाला नाही. त्याने मला ऑफर दिली की त्याला माझी सफिया खरेदी करायची आहे. तो त्याच्या दुकानातही काम करेल. कदाचित, तिचे भाग्य भविष्यात सुधारेल. मी आता पोलिसावरुन हमाल आणि मजूर झालो आहे. त्या दुकानदाराला माझी मुलगी 20 हजार अफगाणी (भारतीय चलनानुसार सुमारे 17 हजार रुपये) मध्ये विकत घ्यायची आहे. माझ्या मुलीला एवढ्या कमी किंमतीत विकून मी काय करणार? मी त्याच्याकडे 50 हजार अफगाणी (भारतीय चलनात सुमारे 43 हजार रुपये) मागितले आहे.
तालिबाननंतर गरीबी नवीन शत्रू
नजीर ही कथा पुढे नेतो. म्हणतो की, साफियाविषयी त्या दुकानदारासोबत माझे बोलणे सुरू आहे. मी त्याला काय देऊ शकतो? कदाचित या पैशातून मी संपूर्ण कुटुंबाला वाचवू शकेन. त्या दुकानदाराने मला वचन दिले आहे की जर मी त्याचे पैसे भविष्यात परत केले तर तो माझे लक्ते-ए-जिगर (काळजाचा तुकडा) मला परत करेल. देशात युद्ध संपले याचा आनंद आहे, पण गरिबी आणि भूक हे नवीन शत्रू आहेत.
प्रकरणावर सविस्तर बोलताना नजीर अस्वस्थ होतो. थोडे थांबून म्हणतात - मी सुद्धा तुमच्यासारखाच आहे. असे समजू नका की मला माझी सफिया आवडत नाही. पण, मी मजबूर आहे आणि दुसरा पर्याय नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.