आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • AFGANISTHAN |FARMERS | Drought, Taliban Ban On Exports Cultivates Opium Instead Of Orchards; Export Of Fruits Also Stopped Due To Long Struggle

अफगाणिस्तान:दुष्काळ, तालिबानच्या निर्यातबंदीमुळे नाइलाजाने फळबागेऐवजी अफूची शेती; दीर्घ संघर्षामुळे देशाबाहेर फळाची निर्यातही बंद

थॉमस गिब्सन नेफ, तैमूर शहा | अर्गनदाब14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फळ व सुकामेव्यासाठी प्रसिद्ध अफगाणिस्तानच्या कंदहार प्रांताची आेळख पुसली जाण्याची शक्यता आहे. राज्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. तलाव आणि सिंचनाची काही व्यवस्था राहिली नसल्याने शेतकऱ्यांवर फळ लागवडी ऐवजी अफूची शेती करण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत डाळिंबाचे उत्पादन घेणारे अब्दुल हामिद म्हणाले, नद्यांमध्ये पाणी नाही.

जमीन कोरडी ठाक आहे. त्यामुळे फळांमध्ये फायदा राहिलेला नाही. त्यात पुन्हा तालिबानसोबतच्या दीर्घ संघर्षामुळे देशाबाहेर फळाची निर्यातही बंद झाली. म्हणजेच सर्व बाजूने नुकसान झाले. आता आम्ही अफूची शेती करायचे ठरवले.

अर्गनबाद जिल्ह्यातील रहिवासी हामिद यांना आतापर्यंत डाळिंबाची ८०० पेक्षा जास्त झाडे तोडावी लागली. झाडे तोडल्याने त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचे रूपांतर कब्रस्तानात झाल्यासारखे वाटू लागले आहे. ८० वर्षीय हामिद म्हणाले, दुष्काळामुळे अनेक प्रकारच्या अडचणींत वाढ होत चालली आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले. विहिरी देखील आटल्या आहेत.

त्यामुळे झाडांचे सिंचन करणे अशक्य झाले आहे. बागेतील बहुतेक झाडे तर पाणी न मिळाल्याने सुकली आहेत. तालिबानसोबतच्या संघर्षामुळे एक वर्षापासून सरकारकडूनदेखील काही मदत मिळत नाही. भयंकर दुष्काळ, आर्थिक विवंचना, युद्ध आणि सीमाही बंद झाल्याने या क्षेत्रातील हुकमी पीक अफूकडे शेतकरी वळला आहे. यातून शेतकऱ्यांना फायदा दिसू लागला आहे. हामिद यांच्या प्रमाणे हजारो शेतकऱ्यांना उत्पन्नाचे एवढेच एक साधन वाटू लागले आहे.

अफगाणमध्ये जगातील ८० टक्के, अफूचे उत्पादन, पाचव्या वर्षी वाढ
संयुक्त राष्ट्राच्या म्हणण्यानुसार जगातील ८० टक्के अफूचे अफगाणिस्तानात उत्पादन होते. तालिबान सत्तेवर आल्यानंतर त्यात वाढ झाली. सलग पाचव्या वर्षी उत्पादन वाढून ६८०० टनांवर गेले आहे. यंदा ८ टक्के वाढ राहिली.

भारत, पाकिस्तान, खाडी देशात, कंदहारची फळे निर्यात व्हायची
डाळिंब उत्पादक मोहंमद उमर म्हणाले, आमच्याकडचे डाळिंब भारत, पाकिस्तानसह खाडी देशात जात. परंतु सीमाबंदी, हवाईसेवा बंद झाल्याने डाळिंबाची खरेदीही बंद पडली. सुकामेव्याचेही तेच झाले आहे. निर्यात होत नाही.

बातम्या आणखी आहेत...