आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअफगाणिस्तानच्या कंधारमध्ये रविवारी झालेल्या हवाई हल्यात 80 हून अधिक दहशतवादी ठार आहे. यामध्ये तालिबानी संघटनेचा प्रमुख सरहदी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता फवाद अमान यांनी दिली. ते पुढे बोलताना म्हणाले की, ही घटना कंधारमधील अरघनदाब जिल्हात झाली असून अशावेळी करण्यात आली ज्यावेळी ते एका हल्लाची तयारी करीत होते. ह्या घटनेची पुष्टी फवाद अमान यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन दिली.
गाड्या आणि टँकदेखील उडवले
चीनमधील सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, या हवाई हल्याच्यादरम्यान दहशतवादी आणि त्यांच्या प्रमुखाचा मृत्यू झाला असून यामध्ये गाड्या आणि टाक्यादेखील उडविण्यात आल्या आहेत. परंतु, आतापर्यंत तालिबानींकडून यावर कोणतेच विधान जारी करण्यात आले नाही.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनी तयार केला शांतीचा रोडमॅप
काही रिपोर्टच्या माध्यमातून दावा करण्यात येतोय की, अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीनी तुर्कीमध्ये होत असलेल्या बैठकीच्या आधी दहशतवाद्यांसमवेत शांतीचा एक रोडमॅप तयार केला होता. यामध्ये त्यांनी निवडणूकपूर्वी तालिबानीसोबत करार आणि युद्धाचा उल्लेख केला आहे.
अमेरिकेनेही तयार केला प्रस्ताव
अफगाणिस्तानातून सर्व परदेशी सैन्यांना माघार घेण्याची अंतिम मुदत 1 मे निश्चित केली गेली होती. यामुळे अमेरिकेने एक प्रस्ताव तयार केला असून तालिबान्यांसोबत करार करण्यासाठी तुर्कीमध्ये यूएनच्या मदतीने एक बैठक घेण्यास दबाव आणत आहे. यामध्ये एक नवीन कायदेशीर यंत्रना उभी करुन त्यामध्ये तालिबान्यांना प्रतिनिधित्व देण्याचा उल्लेख होता. परंतु, हे सर्व अफगाणिस्तानचे राष्ट्रपती गनी यांना मान्य नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.