आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काबूल:अफगाण राजदूताच्या मुलीचे पाकिस्तानमध्ये अपहरण, अनेक तासांच्या अमानुष छळानंतर केली सुटका

काबूलएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानमध्ये अफगाण राजदूत नजीबुल्लाह अलीखील यांच्या मुलीचे इस्लामाबादमधून अपहरण करण्यात आले. छळ करून तिला सोडून देण्यात आले. या घटनेनंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.

अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या एक वक्तव्यात म्हटले की, ‘पाकमध्ये अफगाण राजदूताची मुलगी सिलसिला अलीखीलचे १७ जुलैला अपहरण झाले. तेव्हा ती घरी परतत होती. अपहरणानंतर अनेक तास तिचा अमानुष छळ करण्यात आला. त्यानंतर तिला सोडण्यात आले. तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आम्ही या घटनेचा निषेध करतो. त्याचबरोबर पाकमधील दूतावासात तैनात आपले कर्मचारी, मुत्सद्दी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आंतरराष्ट्रीय कायद्यांतर्गत सुरक्षेची मागणी करतो. हा मुद्दा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयासमोर उपस्थित करणार आहोत. पाकिस्तान सरकारने या घटनेची चौकशी करावी आणि गुन्ह्यात सहभागी लोकांना शिक्षा करावी, अशी मागणी करत आहोत.’

अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य माघारी गेल्यानंतर पाकिस्तान तालिबानला खुला पाठिंबा देत असल्याचा आरोप होत आहे. याच आरोपामुळे दोन्ही देशांत तणाव आहे.

बातम्या आणखी आहेत...