आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्र ठरला शत्रू:अफगाण लष्कराचा पाकवर हल्ला; शेजाऱ्यावर तालिबानचे दुहेरी संकट

अफगाण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचे शाहबाज सरकार तालिबानच्या दुहेरी संकटात सापडले आहे. प्रथम तहरिक-ए-तालिबान-ए-पाकिस्तान(टीटीपी) सामान्य लोक आणि सुरक्षा दलांवर हल्ला करत होते. आता अफगाणी सरकारने पाकिस्तानी लष्करावर हल्ला सुरू केला आहे. अफगाण सुरक्षा रक्षकांद्वारे केलेल्या गोळीबारात ८ लोकांचा मृत्यू झाला आणि १५ जखमी झाले. प्रत्युत्तरात पाकिस्ताननेही गोळीबार केला. त्यात एक अफगाण सैनिक मारला गेला.

अफगाण सैनिक बलुचिस्तानच्या चमन जिल्ह्यानजीक सीमेवर नवीन चेकपोस्ट तयार करू इच्छित होते. पाकिस्तान रेंजर्सनी ते रोखल्यावर त्यांनी उखळी तोफांचा मारा सुरू केला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सोमवारी सांगितले की, अशा घटनांची पुनरावृतती होऊ नये,असे अफगाण सरकारला सांगितले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानने तालिबानला अफगाणिस्तानच्या सत्तेत बसवून आपल्या पायावर कुऱ्हाड मारली. राजकीय तज्ज्ञ हम्माद अली म्हणाले, टीटीपीसह अनेक मुद्द्यांवर लक्ष देणे आवश्यक आहे.

अफगाण सीमेवर मारले गेलेले ११५ पाक पोलिस खैबर पख्तूनख्वाचे पोलिस उपप्रमुख मुहम्मद अली बाबा खेल यांनी सांगितले की, अफगाण तालिबान व प्रतिबंधित टीटीपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये शांतता आणि सुरक्षेच्या आव्हानावरील परिसंवादात त्यांनी सांगितले की, या वर्षी आतापर्यंत ११५ पोलिसांचा सीमेवरील हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पोलिसांवरील हल्ला याचा पुराव आहे की, पोलिस आपले काम प्रामाणिकपणाने करत आहे. नुकतेच पाक-अफगाण सीमेवर बलुचिस्तानात दहशतवादाची लाट दिसली.

खैबर पख्तूनख्वाचे पोलिस उपप्रमुख मुहम्मद अली बाबा खेल यांनी सांगितले की, अफगाण तालिबान व प्रतिबंधित टीटीपी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. खैबर पख्तुनख्वामध्ये शांतता आणि सुरक्षेच्या आव्हानावरील परिसंवादात त्यांनी सांगितले की, या वर्षी आतापर्यंत ११५ पोलिसांचा सीमेवरील हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पोलिसांवरील हल्ला याचा पुराव आहे की, पोलिस आपले काम प्रामाणिकपणाने करत आहे. नुकतेच पाक-अफगाण सीमेवर बलुचिस्तानात दहशतवादाची लाट दिसली.

पाक लष्करावर अफगाणकडून वाढत आहेत हल्ले गेल्या महिन्यात शस्त्रसज्ज अफगाणीने पाक लष्करावर हल्ला केला होता. त्यात एका सैनिकाचा मृत्यू झाला. यासोबत खैबर-पख्तनुख्वा प्रांतातील कुर्रम रस्ता बांधकामावरून वाद उद्भवला. यात पाकिस्तानचे ८ लोक जखमी झाले. विशेष म्हणजे सीमा वादाच्या मुद्द्यावर तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांचे कोणतेही वक्तव्य आले नाही. मात्र, वाद विकोपाला जात आहे.

दोन्ही देशांत सीमेवर वाद, अफगाण तालिबaान पाकिस्तानवर वरचढ पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात अनेक वर्षांपासून सीमा वाद सुरू आहे. दोन्ही देशांत २६०० किमी लांब सीमा आहे. ९०% सीमेवर पाकने तारकुंपण केले आहे. त्यास डुरंड लाइन म्हटले जाते. अफगाणिस्तान डूरंडला स्वीकारत नाही. सुरुवातीस तालिबानचे वरिष्ठ कमांडर म्हणाले होते की, ते पाकिस्तानला सीमेवर कुंपण लावण्यास परवानगी देणार नाही.

बातम्या आणखी आहेत...