आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:अमेरिकेत पोहोचलेल्या अफगाणी निर्वासितांची सैन्यतळावर 30 दिवस सखोल चाैकशी... योग्य असल्यास 1200 डॉलर मदत

न्यूयॉर्क / मोहंमद अली11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 80 हजार अफगाणी अमेरिकेत, पेंटागॉनचा तपास सुरू, चुकीच्या व्यक्तीला प्रवेश नाही

अफगाणिस्तानातून शेवटचे अमेरिकी विमान निघून आता आठवडा उलटला आहे. या आंतरराष्ट्रीय घडामोडींदरम्यान अमेरिकेसमोर एक नवे आव्हान असे आहे की, ज्या अफगाणींना निर्वासित म्हणून अमेरिकेने अफगाणिस्तानातून बाहेर काढले त्यांचे पुनर्वसन कसे करायचे? बायडेन प्रशासनातील अधिकाऱ्याच्या मते या अफगाणी निर्वासितांची संख्या ८० हजारांहून अधिक आहे. देशात त्यांचे पुनर्वसन करण्यापूर्वी त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. यासाठी पेंटागॉनच्या ४ सैन्यतळांसोबतच आणखी काही स्थळ तयार केले जात आहेत. चौकशीनंतरच त्यांना ‘स्पेशल इमिग्रेंट व्हिसा’ दिला जात आहे. काही निर्वासित असेही आहेत की ते योग्य असतानाही व्हिसाच्या अटी पूर्ण करू शकत नाहीत. त्यांना ‘ह्यूमेनिटेरियन पॅरोलवर देशात प्रवेशाची परवानगी दिली जात आहे. बायडेन प्रशासनातील अधिकारी म्हणाला की, अफगाणिस्तानातून जे लोक अमेरिकेत पोहोचत आहेत त्यांना प्रथम सैन्यतळांवर ठेवले आहे. ३० दिवसांपर्यंत त्यांची सखोल चौकशी केली जात आहे. अमेरिकी होमलँड सेक्युरिटीतील एका अधिकाऱ्याच्या मते निर्वासितांचा पूर्ण इतिहास तपासण्याबरोबरच बायोमॅट्रिक चौकशीही केली जात आहे. काही जणांना या चौकशीसाठी कतार आिण ओमानलाही नेले आहे. चौकशीसाठी पेंटागॉनने आपले ४ सैन्यतळ निश्चित केले आहेत. न्यूजर्सीत मॅक्ग्वायर-डिक्स-लेकहर्स्ट जॉइंट बेस, व्हर्जिनियात फोर्ट ली, टेक्सासमध्ये फोर्ट ब्लिस आणि विस्कॉन्सिनमध्ये फोर्ट मॅक्कॉय येथे निर्वासितांची चौकशी सुरू आहे.

वर्जीनियात क्वांटिको येथील मरीन कोर तळावर आणि वॉशिंग्टन डीसीजवळील डलस एक्सपो सेंटरमध्येही हेच काम सुरू आहे. सूत्रांच्या मते न्यूयॉर्कच्या जेएफके विमानतळावरील कार्गो बिल्डिंगमध्येही निर्वासितांची पर्यायी व्यवस्था केली जात आहे. सैन्यतळांवर चौकशीसह कागदपत्रे मिळवून देण्याची मदत केली जात आहे. त्यांना अमेरिकी संस्कृतीची जाण करून देण्यासाठी ओरिएंटेशन कोर्स दिला जात आहे. प्रत्येक निर्वासिताची कोरोना चाचणी केली जात आहे. डलस एक्स्पो सेंटरमध्ये लसीकरण शिबिरही सुरू करण्यात आले आहे. या निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी एनजीओ आणि धार्मिक संस्थाही काम करत आहेत. सैन्यतळांवर चौकशी पूर्ण झाल्यानंतर या समूहांशी चर्चा करून त्यांना कोठे पाठवावे, याचा निर्णय घेतला जात आहे. यूएस कॉन्फरन्स ऑफ कॅथोलिक बिशप्समध्ये मायग्रेशन एंड रिफ्यूजी सर्व्हिसेसचे कार्यकारी संचालक बिल केनी म्हणाले की, ही सर्व कुटुंबे अमेरिकेप्रती निष्ठावंत आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये.

५ जणांच्या कुटुंबाला मिळत आहे सुमारे ४.४ लाख रुपयांची सरकारी मदत
सरकारकडून प्रत्येक निर्वासितासाठी १२०० डॉलर म्हणजे सुमारे ८८ हजार रुपयांची एकरकमी मदत दिली जाते. ही रक्कम मोठे आणि मुलांसाठी एकसारखी आहे. म्हणजे ५ जणांच्या कुटुंबाला ६ हजार डॉलर म्हणजे सुमारे ४.४ लाख रुपये एकरकमी मिळत आहेत. ते ९० दिवसांत खर्च करावे लागणार आहेत. पुनर्वसन संस्था या रकमेतून कुटुंबासाठी घर, फर्निचर व इतर वस्तूंची तजवीज करतात. अशीच एक संस्था रायसेसच्या उपाध्यक्षा मॅरीसोल गिरेला म्हणाल्या की, या परिवारांना नगदी मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. लोक जितके जास्त दान करतील तेवढे या लोकांसाठी सरकारचे पैसे वाचतील.

बातम्या आणखी आहेत...